

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा शो India’s Got Latent बद्दल आणखी एक अपडेट समोर आले आहे. नुकताच या शोचा नवा एपिसोड रिलीज झाला होता. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने असे काही विधान केले की, ज्यामुळे वाद निर्माण झाला. इतकेच नाही तर त्याच्याविरोधात आणि शोच्या संपूर्ण टीम विरोधात दिल्ली, मुंबईत केस दाखल करण्यात आलीय. मीडिया रिपोर्टनुसार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी देखील सांगितलं की, शो च्या टीमच्या विरोधात आसाममध्येही केस दाखल करण्यात आलीय. आता या वादग्रस्त एपिसोडमधील तो व्हिडिओ YouTube वरून हटवण्यात आला आहे.
हा वादग्रस्त व्हिडिओ NHRC ने यूट्यूबवरून हटवण्याचे निर्देश दिले होते. तसेच ३ दिवसांच्या आता उत्तर देण्याचे निर्देश दिले गेले. त्यानंतर व्हिडिओ हटवण्यात आला. केस दाखल झाल्यानंतर इंडिया गॉट लॅटेंट शो प्रकरणी मुंबई पोलिसांनी समय रैना आणि रणवीर इलाहाबादियाशी संपर्क साधला. पोलिसांनी दोघांना तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
या वादग्रस्त एपिसोडनंतर सोशल मीडिया युजर्सने आपल्या अकाऊंट्सवर रणवीर आणि इंडिया गॉट लॅटेंट बॅन करण्याची मागणी केली आहे. तसेच काहींनी रणवीरला अनसब्सक्राईब देखील केलं आहे.