

Game of Thrones काही वेळा नियती असे खेळ दाखवते की लोकांचा स्वतःवरदेखील विश्वास बसत नाही अशीच घटना जर्मनीमध्ये घडली आहे. एका मेट्रोमध्ये प्रवास करत असताना एका भारतीय युवकाच्या बाजूला एक युवती येऊन बसली. पण त्या युवकाने तिची दखलही घेतली नाही. ही गोष्ट इतर सहप्रवाशांना थोडी अंचबित करणारी ठरली. सहप्रवाशांनी याचा व्हिडीओ, फोटो काढून ते सोशल मिडीयावर टाकले. व याची जोरदार चर्चा होऊ लागली. सध्या समाजमाध्यमांवर ही स्टोरी जोरात व्हायरल होत आहे.
पूर्ण जर्मनीमध्ये हा फोटो व्हायरल झाला. कारण त्या युवकाच्या बाजूला बसलेली जी युवती होती ती प्रसिद्ध अभिनेत्री मेसि विलियमस Maisie Williams होती. पण त्या युवकाला याची अजिबात कल्पना नव्हती. कारण गेम ऑफ थ्रोन या वेबसिरीजमुळे मेसी ही जगभरात खूप प्रसिद्ध आहे. तिने आर्या स्टार्कची भूमिका केली होती. तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी लोक वेडे होतात. पण या युवकाने तिची जराही दखल घेतली नाही. आणि हीच गोष्ट लोकांना कमाल वाटली.
नंतर जेव्हा जर्मनीतील ‘डेर स्पीगल’ या मासिकाने याची दखल घेतली. कारण इतक्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्री ट्रेन प्रवासात सोबत बसून तिची दखल न घेणार हा युवक कोण याचा शोध घ्यायचे ठरवले. त्यानंतर हा भारतीय युवक म्युनिक शहरात सापडला. पण त्याचे नाव मात्र गुप्त ठेवण्यात आले आहे.
जगासमोर आली कहाणी
रोजगाराच्या शोधात भारतातून जर्मनीत गेलेल्या या युवकाची परिस्थिती बिकट होती. कारण तो बेकायदेशीररित्या जर्मनीत वास्तव्य करत होता. तसेच त्याच्याजवळ पैसेही नव्हते हाताला काम नसल्याने वाईट परीस्थिती होती. एवढेच काय तो रेल्वेतूनही फुकट प्रवास करत असे. या मासिकाच्या पत्रकाराने जेव्हा त्या घटनेबद्दल त्याला विचारले तेव्हा त्याची गोष्ट जगासमोर आली व त्याचे नशीबही बदलून गेली.
...आणि बदलले नशीब
समाज माध्यमात आलेल्यास माहितीनुसार ही गोष्ट ऐकून आणि त्या युवकाच्या खरेपणा पाहून ‘डेर स्पीगल’ मासिकाने त्या युवकाला मासिकाचा पोस्टमन म्हणून नोकरीची ऑफर दिली. तसेच 800 युरो महिना पगाराचे कॉन्ट्रॅक्टही केले. या नोकरीमुळे त्या युवकाला जर्मनीत राहायचा वैध परवानाही मिळाला कामही मिळाले. नियती नशिबाचा खेळ कुठे कसा घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एका व्हायरल फोटोमुळे, विनातिकीट प्रवासात व एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वामुळे या युवकाचे नशिबच पालटले.