.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - स्वातंत्र्य दिनी 'स्त्री २', 'वेदा' आणि 'खेल खेल में' रिलीज झाला आहे. आजचा दिवस सिनेरसिकांसाठी खूप खास ठरला आहे. राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’, जॉन अब्राहमचा ‘वेदा’ आणि अक्षय कुमार स्टारर ‘खेल खेल में’ हे चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाले आहेत. अभिषेक बॅनर्जीने ‘स्त्री २’ और ‘वेदा’ दोन्हीही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, या दोन्ही चित्रपटात राम करण्याचा अनुभव खूपच शानदार होता.
अभिषेक बॅनर्जी एका मुलाखतीत म्हणाला, हा अनुभव त्याच्यासाठी वेगळा होता. थिएटर करताना त्यांनी कधी एकाच दिवसात दो शो शेड्यूल केले नाहीत. हे काम करताना तो स्वत:ला खूप भाग्यशाली मानतो.
राजकुमार राव - श्रद्धा कपूरचा चित्रपट फिल्म ‘स्त्री २’ आज देशभरात रिलीज झाला. १५ ऑगस्टची सुट्टी आणि लॉन्ग वीकेंडचा फायदा या चित्रपटाला मिळेल. या चित्रपटाचा पहिला भाग सिनेरसिकांना इतका आवडला होता की, दुसरा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग देखील बंपर ठरले. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच खूप धमाकेदार ठरलेला चित्रपट शानदार बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल.
शर्वरी वाघने चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलीय. तिच्या अभिनयाचे, संवादाचे कौतुक तर आहेच पण जॉन अब्राहमची ॲक्शन हीच त्याची तगडा कलाकार असल्याची ओळख बनलीय. तर खलनायकाच्या भूमिकेत अभिषेकने उत्तम काम केलं आहे. आशीष विद्यार्थीने पुन्हा एकदा शानदार अभिनय केला आहे. क्षितीज चौहानचे काम देखील खूप छान आहे. अभिषेकच्या लहान भावाच्या भूमिकेत आहे. तर तमन्ना भाटियाचा कॅमियो देखील चांगला आहे. कुमुद मिश्राची छोटी भूमिका असली तरी आठवणीत राहिली आहे.
निखिल आडवाणी यांचे दिग्दर्शन असलेला वेदा फर्स्ट हाफमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पण नंतर सेकेंद हाफमध्ये प्रेक्षकांना म्हणावा तसा चित्रपट वाटला नाही