IIFA 2024 | शाहिद कपूर ते राशी खन्ना हे कलाकार करणार परफॉर्म

राशी खन्ना ते जान्हवी कपूर आयफा २०२४ मध्ये धमाल करण्यासाठी सज्ज
IIFA 2024
हे सेलिब्रिटीज आयफा सोहळ्यात डान्स परफॉर्म करणार आहेत.Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - आयफा सोहळा लवकरच पार पडणार असून (IIFA) यंदा २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयलंड अबुधाबी येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात हे सेलिब्रिटी त्यांचा परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज आहेत.

शाहिद कपूर : 'अखियां गुलाब' आणि 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' सारखे नवीन सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. आता हा अभिनेता पुन्हा एकदा आयफामध्ये परफॉर्म करण्याबद्दल बोलत असताना म्हणतो, "प्रत्येक वेळी मी त्या प्रतिष्ठित जागतिक मंचावर पाऊल ठेवतो तेव्हा जादू निर्माण करतोय."

राशी खन्ना : या वर्षी अभिनेत्रीने 'अरनमानाई 4' मधील 'अचाचो' गाण्याने धुमाकूळ घातला आहे. आता अभिनेत्री राशी तिच्या दमदार डान्स मुव्ह्जने लक्षवेधी ठरणार आहे.

विकी कौशल : ‘तौबा तौबा’ या व्हायरल गाण्यामुळे विक्कीचे फॅन फॉलोईंग आणखी वाढले आहे. आता विकी हा पुरस्कार सोहळा को-होस्ट करताना दिसणार आहे.

क्रिती सेनॉन : क्रितीने 'द क्रू' आणि 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' सोबत आपली प्रतिमा आणखी उंचावली आहे. अभिनेत्री आयफामध्ये परफॉर्म करणार आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "आयफा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि दरवर्षी घरवापसी केल्यासारखे वाटते."

जान्हवी कपूर : देवरा’ स्टार प्रतिष्ठित आयफा मंचावर धडाकेबाज कामगिरीसह पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची उत्कंठा व्यक्त करताना जान्हवीने नमूद केले की, "जगातील भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्वात मोठ्या सोहळ्यात" परफॉर्म करताना तिला खूप आनंद झाला आहे.

अनन्या पांडे : नुकतेच तिच्या वेब सीरिजमध्ये पदार्पण केल्यामुळे अनन्याची चर्चा आहे. तिच्या दमदार अभिनयाने ती धुमाकूळ घालणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news