Hya Goshtila Navach Nahi | चित्रचौकटीतून उलगडणार जगण्याचा अर्थ

'ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर पाहिला का?
Hya Goshtila Navach Nahi
जयदीप कोडोलीकरची भूमिका या चित्रपटात दिसणार आहेinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - उत्तम संहिता असलेला संदीप सावंत दिग्दर्शित आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतं. कधी कधी आयुष्य अशा वळणावर उभं करत की, आपल्यामागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या आधाराची गरज भासते. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखविणारा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे, अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदी कलाकार या चित्रपटात आहेत.

डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमध्ये, अनुभवांमध्येही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो. हे सांगण्याचा प्रयत्न ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत. पायोस मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर निर्मित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे.

छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाईन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंगमिक्सर अनुप देव यांचे आहे.

Hya Goshtila Navach Nahi
Sanjay Narvekar | ‘सदा राणे’ खतरनाक खलनायक येणार भेटीला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news