पुढारी ऑनलाईन डेस्क - 'हम साथ-साथ हैं' या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर २५ वर्षांनी सलमान खान आणि सोनाली बेंद्रे एका कॅमेरासमोर आले. सलमान खान-सोनाली बेंद्रे २८ ऑगस्ट, २०२४ रोजी मुंबईमध्ये एका फौंडेशनच्या गणेश चतुर्थी इको-फ्रेंडली उत्सवात ते सहभागी झाले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, सलमान खान सोफ्यावर बसलेला दिसतो आहेय जेव्हा सोनाली बेंद्रे कार्यक्रमात पोहोचते, तेव्हा तो उठून उभा राहतो. आणखी एका व्हिडिओमध्ये सोनाली सलमानला आलिंगन देताना दिसते. २५ वर्षांनंतर दोघे एकत्र आल्याने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट्स देणे सुरुचं ठेवले.
याशिवाय, त्याने 'जलवा' गाण्यावर डान्स केला. गणपतीची मूर्ती हातात घेऊन पोजदेखील दिली. यावेळी सलमान खान लाईट ब्ल्यू कलरचा टी-शर्ट - मॅचिंग डेनिम जीन्समध्ये हँडसम दिसत होता. तर सोनालीने फ्लोरल प्रिंट व्हाईट सूटमध्ये चारचाँद लावले. कार्यक्रमात गायक कैलाश खैरदेखील पोहोचले होते. बम लहरी, गणेश वंदन यासारखी गाणी त्यांनी कार्यक्रमात गायली.
सलमान खान सध्या साजिद नाडियाडवालाचा आगामी चित्रपट 'सिकंदर' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट ईद २०२५ मध्ये रिलीज होईल. चित्रपटामध्ये सुनील शेट्टी, रश्मिका मंदाना, अन्य कलाकार आहेत.