पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्टीस्टारर चित्रपट 'हाऊसफुल्ल ५' मध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख पुन्हा एकदा प्रेक्षकांना एटंरटेन करण्यासाठी तयार आहेत. आता या यादीत बॉबी देओल, जॉन अब्राहम अर्जुन रामपाल यांचाही समावेश झाला आहे.
अधिक वाचा –
अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम आणि बॉबी देओलने फ्रेंचायजी पहिली, दुसरी आणि चौथ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती रिपोर्ट्सनुसार, दोन ग्रुपमध्ये या कलाकारां विभागणी होईल. फ्रेंचायजीमध्ये दुहेरी भूमिका साकारणारे अभिनेते चंकी पांडे सध्या चर्चेत आहेत. जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फाखरी आणि लारा दत्ता यांचा समावेश आहे. सहाय्यक भूमिकेत अनेक लोकप्रिय कलाकार आहेत.
अधिक वाचा –
याचित्रपटाचे शूटिंग क्रूझवर होणार आहे. ऑगस्टमध्ये लंडन येथे शूटिंग होईल. रिपोर्ट्सनुसार, स्कॉटलँड, आयरलँड, फ्रान्स आणि स्पेन शिवाय न्यूकॅसल, इंग्लंडमध्ये चित्रपटाचे शूटिंग होईल.
अधिक वाचा –
अफवा ही होती की, अनिल कपूर चित्रपटामध्ये आपल्या भूमिकेसाठी बातचीत करतील. पण, आता ते हाऊसफुल्ल ५ मध्ये दिसणार नाहीत.