Mirzapur 4 : 'मिर्झापूर'चा 'कालिन भैय्या' बदलणार, पंकजची जागा घेणार हृतिक रोशन?

'मिर्झापूर'चा 'कालिन भैय्या' बदलणार, पंकजची जागा घेणार हृतिक रोशन?
Mirzapur 4
'मिर्झापूर'चा 'कालिन भैय्या' बदलणार, पंकजची जागा घेणार हृतिक रोशन? Hrithik Roshan Pankaj Tripathi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज खूपच गाजली. या वेबसीरिजचा पहिला सीझन २०१८ मध्ये, दुसरा सीझन २०२० मध्ये आणि तिसरा सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या तिन्ही सीझनला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यामुळे चाहत्यांनी त्याच्या आगामी चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान पंकज त्रिपाठी आगामी वेबसीरिजमध्ये असणार नाही? असे बोलले जात आहे. यामुळे त्याच्या भूमिकेत कदाचित नव्या कलाकरांची एन्ट्री होणार आहे.

मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये अभिनेता दिव्येंदू शर्माने 'मुन्ना भैया' आणि पंकज त्रिपाठीने 'कालिन भैय्या' साकारली आहे. आगामी चौथ्या सीझनमध्येही हे कलाकर दिसणार अशी आशा होती. मात्र, विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टनुसार, पंकज त्रिपाठी म्हणजे, तुमचा लाडका 'कालिन भैय्या' दिसणार नसल्याचे म्हटलं जात आहे. तसेच पंकजकडून कालिन भैयाची भूमिका हिरावून घेतली जाऊ शकते असे दिसत आहे.

याशिवाय या संदर्भात एक्सेल एंटरटेनमेंटशीही चर्चा सुरू असून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यात 'कालिन भैय्या'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, 'कालिन भैय्या'च्या भूमिकेसाठी हृतिकला साईन केलं आहे की नाही? याबद्दल अध्याप अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. मिर्झापूरचे दिग्दर्शक गुरमीत सिंग यांनीही याबबात कोणतेही व्यक्तव्य केलेले नाही.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांना पंकज त्रिपाठीऐवजी हृतिक रोशन 'कालिन भैय्या'ची भूमिका साकारणार आहे हे फारसे आवडलेले दिसत नाही. दरम्यान एका यूजर्सने या पोस्टवर कॉमेन्टस करताना लिहिले आहे की, ''कालिन भैय्या'च्या भूमिकेत पंकज त्रिपाठी उत्कृष्ट आहे.' दुसऱ्या एकाने लिहिलेयं की, 'असे होऊ शकत नाही, पंकज त्रिपाठी यांची जागा घेता येणार नाही.' याशिवाय मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझममध्ये पंकजची भूमिका कमी असल्याने नेटकऱ्यांच्यात नाराजी पसरली होती.

Mirzapur 4
Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news