

Chal Bhava Citit 2025 Season 1 Zee Marathi Reality Show Grand Finale
पुणे : झी मराठीवर सुरू असलेला चल भावा सिटीत हा रिअलिटी शो आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन संपला आहे. अत्यंत हटके आणि युनिक आयडिया असलेल्या या शोने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. श्रेयस तळपदेच्या दमदार होस्टिंगने या शोमध्ये अधिक रंगत आणली. आता या शोचा फिनाले जसा जसा जवळ येईल तसे या पहिल्या सीझनचा विजेता कोण होईल याची उत्सुकता वाढली होती .
संपूर्ण शोमध्ये अनेक चॅलेंज आणि अडथळे पार केल्यानंतर प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्यात एक भावनिक बांध निर्माण झाला. भोळे भाबडे गडी आणि त्यांच्यासोबत असलेली सुंदर ललनेची कोणती जोडी ही स्पर्धा जिंकेल याचे अंदाज आतापासूनच बांधले जात होते.
नेहमीच्या त्याच त्याच रिअलिटी शोपेक्षा वेगळा बेस आणि संदर्भ या रिअलिटी शो प्रेक्षकांसमोर मांडला. गावाकडच्या मातीशी नाळ जोडलेली असतानाच शहरातील झगमगाटाशी जोडलेले असणे हे या शोचे मुख्य गमक होते. या शोमध्ये विजोड वाटत असलेल्या जोड्या एकत्र आल्या. यावेळी एकमेकांना सपोर्ट करत त्यांनी शोमध्ये एका विशिष्ट स्टेपपर्यंतही आल्या होत्या.
सध्या समोर असलेल्या टॉप 5 मधून टॉप 2 निवडणे हा मोठा टास्क होता यात शंका नाही. पण जोड्यांची असलेली बॉंडिंग, केमिस्ट्री सगळ्यांना आवडली आहे. हे टॉप 5 म्हणजे विजय खोबले आणि अनुश्री माने, अथर्व जगताप आणि रेवती अय्यर, रामा सोनवणे आणि नीता विजय निघवाणे, दीपक कोळी आणि प्रणाली घोगरे, हृषिकेश चव्हाण आणि श्रुती राऊळ.
पाच अंतिम जोडींमधून, रेवती-अथर्वा, प्रणाली-दीपक, आणि हृषिकेश-श्रुती या जोड्या प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ठरल्या. यामध्ये प्रणाली आणि दीपक रनर-अप ठरले तर रेवती-अथर्व हे तिसऱ्या स्थानी थांबले. अर्थातच या रिअलिटी शोची विजेती जोडी ठरली हृषिकेश चव्हाण आणि श्रुती राऊळ. फिनालेच्या जल्लोषपूर्ण वातावरणात चल भावा सिटीत ची पहिली वाहिली ट्रॉफी हृषिकेश चव्हाण आणि श्रुती राऊळच्या हातात विसावली.