

आमीर खानचा सितारे जमीन पर कालच रिलीज झाला आहे. या सिनेमावर बऱ्याच ठिकाणांहून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या आशिष पेंडसेच्या कामचेही कौतूक होताना दिसत आहे. सितारे जमीन परचा हा हीरो आणि त्याची रियल लाईफ स्टोरी तुम्हालाही प्रेरणा देईल अशीच आहे.
जिद्द आणि विश्वास असेल तर कोणताही अडथळा तुम्हाला अडवू शकत नाही हे आशिषने दाखवून दिले आहे. आपली परिस्थिति अडचण न मानता ताकद बनवली तर यश सहज प्राप्त होते. 37 वर्षांच्या आशिषने हे सिद्ध केले आहे. आशिषचे वडील एसबीआयमध्ये काम करत होते. पण त्यांनी मुलासाठी वेळेआधीच रिटायरमेंट घेतली. या दरम्यान त्याच्या आईची प्रेरणाही पावलो पावली सोबत होती. आशिषला घरात वाढवताना इतर नॉर्मल मुलांप्रमाणेच वाढवले आहे.
वडिलांच्या सांगण्यावरून आशिष किराणा दुकानावर पॅकिंग करण्याचे काम करू लागला. त्यामुळे त्याला सहज वावरण्याचा आत्मविश्वास आलाच याशिवाय त्याच्या हाताची ताकदही वाढली. आशिषचे instagram अकाऊंटही आहे. तिथे त्याचे 296 फॉलोअर्स आहेत. अर्थात सितारे जमीन पर नंतर त्याच्यात वाढ होईल यात शंका नाही.
आशिष ने सांगितले की एके दिवशी मुंबईहून फोन आला होता. त्यांनी ऑडिशनला बोलवले होते. ऑडिशनमध्ये त्याला काही ऐकवायला लावले. तर त्यावेळी त्याने अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवली. त्यावर सगळेच प्रभावित झाले होते. दिग्दर्शकांनी त्याच्या आत्मविश्वासावर प्रभावित होऊन त्याला या सिनेमासाठी साईन केले होते. विशेष म्हणजे डाउन सिंड्रोम असलेल्या कास्टशी कसे वागायचे याचे ट्रेनिंग ही सर्व क्रू मेंबरना यावेळी दिले गेले होते.