डकोटा जॉन्सन साकारणार स्पायडर वुमन

डकोटा जॉन्सन साकारणार स्पायडर वुमन

पुढारी ऑनलाईन

हॉलीवूडच्या 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे', 'फिफ्टी शेड्स डार्कर' आणि 'फिफ्टी शेड्स फ्रीड' या बोल्ड चित्रपट ट्रायोलॉजीतील अभिनेत्री डकोटा जॉन्सनचे जगभरात चाहते आहेत. आता डकोटा आणखी एका मोठ्या फिल्म फ्रँचायजीमध्ये जोडली जात आहे. ही फिल्म फ्रँचायजी 'स्पायडर मॅन'ची आहे. डकोटाने तिच्या इन्स्टा हँडरवर एक लेख शेअर केला आहे. ज्यात ती स्पायडर मॅनच्या आगामी चित्रपटात काम करत असल्याचे म्हटले आहे, तसेच तिने कोळ्याच्या जाळ्याचा इमोजी कॅप्शनमध्ये टाकला आहे.

'मॅडम वेब' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या; पण त्यावर कुणीच शिक्‍कामोर्तब करत नव्हते. आता डकोटानेच ही पोस्ट करून त्यावर एकप्रकारे शिक्‍कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. एस. जे. क्‍लार्कसन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news