'अँजेलिना जोली'ने मागे घेतला ब्रॅड पिट विरुद्धचा खटला, प्रकरण काय?

Angelina Jolie Vs Brad Pitt | दोघांमध्ये विमानात काय घडले होते?
Angelina Jolie, Brad Pitt
अँजेलिना जोली हिने तिचा एक्स पार्टनर ब्रॅड पिट याच्याविरुद्धचा २०१६ मधील घटनेशी संबंधित खटला मागे घेतला आहे. (Image source- Instagram)
Published on
Updated on

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली (Hollywood actress Angelina Jolie) हिने तिचा एक्स पार्टनर ब्रॅड पिट (Brad Pitt) याच्याविरुद्धचा २०१६ मधील घटनेशी संबंधित खटला मागे घेतला आहे. हा तोच खटला आहे; ज्यानंतर अँजेलिनाने ब्रॅड पिट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. दोघांमध्ये विमानात जोरदार भांडण झाले होते. विमानात त्यावेळी जे काही झाले; तोच त्यांच्या नात्याचा शेवट होता, असे अँजेलिनाने त्यावेळी म्हटले होते. कथित विमानातील वादाच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे जारी केल्याबद्दल न्याय विभाग आणि एफबीआयमधील खटला मागे घेतला आहे. हा वाद अँजेलिना आणि तिचा एक्स पार्टनर ब्रॅड पिट यांच्यात झाला होता.

E! News च्या वृत्तानुसार, अँजेलिनाने न्याय विभाग आणि एफबीआयमधील खटला मागे घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यामुळे दोघांमधील न्यायालयीन लढाई संपणार आहे. या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर शुल्क आणि खर्च दोन्ही पक्ष उचलतील, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.

विमानात नेमकं काय घडलं होतं?

या प्रकरणी निनावी म्हणून सूचीबद्ध झालेल्या फिर्यादीसह एप्रिल २०२२ मध्ये खटला दाखल करण्यात आला होता. एनबीसीच्या वृत्तानुसार, अँजेलिनाने तक्रारीत म्हटले होते, ''तिच्या (एक्स) पतीने विमानात तिच्यावर आणि तिच्या मुलांना कथितरित्या मारहाण केली. तसेच जोरदार शाब्दिक वाद झाला होता. यामुळे त्यांच्यावर शारिरीक आणि मानसिक आघात झाला." नंतर, या आरोपांना एफबीआयच्या रिपोर्टमधून (FBI report) पुष्टी मिळाली; ज्यात अँजेलिनाने ब्रॅड पिटवर १४ सप्टेंबर २०१६ रोजी युरोपहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात तिच्यावर आणि तिच्या एका मुलावर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पिट याच्यावर कोणतेही आरोप लावण्यात आले नाहीत. त्याने गैरवर्तन केल्याचा आरोपही फेटाळून लावला.

२०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट

अँजेलिना जोलीने १९ सप्टेंबर २०१६ रोजी ब्रॅड पिट याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.

अँजेलिनाचा मारिया चित्रपट चर्चेत

अँजेलिना ही जगातील सर्वांत सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाते. ती हॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. सध्या तिचा मारिया चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर पिट याने त्याचा जवळचा मित्र जॉर्ज क्लूनी सोबत नुकत्याच रिलीज झालेल्या कॉमेडी थ्रिलर चित्रपट 'वुल्फ्स'मध्ये (Wolfs) काम केले आहे.

Angelina Jolie, Brad Pitt
Kubra Aykut | स्वतःशी लग्न करणाऱ्या कुबराने संपवले जीवन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news