Television : 'एखाद्याची प्रतिमा खराब करणे खूप लाजिरवाणे'; शिल्पा शिंदे यांच्या खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांवर हिना खान संतप्त

"शिल्पा शिंदेच्या कबुलीनंतर हिना खानचा सवाल; ‘पुन्हा असे झाले तर?’"
'एखाद्याची प्रतिमा खराब करणे खूप लाजिरवाणे'; शिल्पा शिंदे यांच्या खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांवर हिना खान संतप्त
'एखाद्याची प्रतिमा खराब करणे खूप लाजिरवाणे'; शिल्पा शिंदे यांच्या खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांवर हिना खान संतप्तfile photo
Published on
Updated on

hina khan angry on shilpa shinde false sexual harassment allegations actress says i am shocked

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री Shilpa Shinde हिने नुकतेच Bharti Singh हिच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला होता की, तिने 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेच्या निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप केला होता. या विधानानंतर अभिनेत्री Hina Khan हिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'एखाद्याची प्रतिमा खराब करणे खूप लाजिरवाणे'; शिल्पा शिंदे यांच्या खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांवर हिना खान संतप्त
Shilpa Shinde : शिल्पा शिंदेनं लैंगिक छळाचा केला होता खोटा आरोप... मात्र विषय वेगळाच; जाणून घ्या खरं कारण

हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "मी सहसा कोणाबद्दलही बोलत नाही किंवा इतरांच्या वैयक्तिक प्रकरणांवर प्रतिक्रिया देत नाही. मात्र एखादा संवेदनशील विषय समाजावर, विशेषतः महिलांवर परिणाम करणारा असेल, तेव्हाच मी माझे मत मांडते."

ति पुढे म्हणाली, "लोकांसमोर आपले मत मांडण्याचे व्यासपीठ मिळालेली व्यक्ती म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. एखाद्या वादात जिंकण्यासाठी किंवा दुसऱ्याची प्रतिमा खराब करण्यासाठी स्वतःच्या लैंगिकतेचा वापर करणे अत्यंत लाजिरवाणे आहे."

हिनाने पुढे नमूद केले की, खऱ्या पीडितांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे. "हे ऐकून मी पूर्णपणे हादरले आहे. माझ्याकडे शब्दच नाहीत," असे तिने म्हटले.

'एखाद्याची प्रतिमा खराब करणे खूप लाजिरवाणे'; शिल्पा शिंदे यांच्या खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांवर हिना खान संतप्त
Kangana Ranaut On Girija Oak |'अपने खुबसुरती का इस्तेमाल करो', 'नॅशनल क्रश'च्या प्रश्नावर मिश्किल उत्तर, गिरीजाच्या सौंदर्यावर कंगना फिदा

त्यानंतर तिने या प्रकरणातील निर्मात्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत लिहिले, "मी त्या खऱ्या पीडित व्यक्तीबद्दल बोलू इच्छिते. एक सन्माननीय व्यक्ती, ज्यांचे कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलगी आहे आणि घरात इतरही महिला आहेत. एक मेहनती निर्माता, ज्यांनी अनेक लोकप्रिय मालिका निर्माण केल्या. त्यांना इतक्या मोठ्या संकटातून जावे लागले."

हिना पुढे म्हणाली, "त्या अभिनेत्रीने स्वतः कबूल केले आहे की, आरोप केवळ निराधार नव्हते, तर स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, वाद जिंकण्यासाठी, आपली बाजू मजबूत करण्यासाठी आणि कायदेशीर मार्ग न वापरता प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला होता."

तिने आश्चर्य व्यक्त करत म्हटले, "इतके सगळे झाल्यानंतरही त्याच निर्मात्याने त्या व्यक्तीला पुन्हा त्याच शोमध्ये संधी दिली. पुन्हा एकदा स्वतःची बाजू मांडण्याचे व्यासपीठ, चर्चेत येण्याची संधी आणि खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न. जर त्या कलाकाराने पुन्हा असेच केले तर? हे सर्व पाहून मी खरोखरच आश्चर्यचकित आहे. शेवटी, या सगळ्यात आपलीच थट्टा होत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news