Jennifer Winget : टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या आयुष्यात ‘मिस्टर राईट’ची एन्ट्री? विल्यम इस्माईल चर्चेत

जेनिफर विंगेटचे कथित बॉयफ्रेंड विल्यम इस्माईल कोण? लग्नाच्या चर्चांनी वेधले लक्ष
Jennifer Winget
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या आयुष्यात ‘मिस्टर राईट’ची एन्ट्री? विल्यम इस्माईल चर्चेतfile photo
Published on
Updated on

Has ‘Mr. Right’ entered TV actress Jennifer Winget’s life? William Ismail in the spotlight

पुढारी ऑनलाईन : व्यवसायाने विल्यम इस्माईल हे सिंगापूरमधील उद्योजक आणि वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. सध्या ते एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये डायरेक्टर – बिझनेस डेव्हलपमेंट अँड ट्रेडिंग या पदावर कार्यरत आहेत.

Jennifer Winget
‘धुरंधर’ची हिरोईन रणवीर सिंहपेक्षा 20 वर्षांनी लहान, वडील सुपरस्टार तर आई आहे डान्स टीचर

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री Jennifer Winget हिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सध्या मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. जेनिफर लवकरच सिंगापूरस्थित उद्योजक William Ismail यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, जेनिफरने अद्याप या वृत्तांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही लग्नाच्या चर्चांमुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. एका वृत्तानुसार, सुट्टीदरम्यान विल्यम यांनी जेनिफरला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिने त्याला होकार दिला. सध्या चाहते जेनिफरकडून अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. दोघे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये विवाह करू शकतात, असा दावा केला जात आहे.

Jennifer Winget
Kolhapur Medical Hub | कोल्हापूर होतंय मेडिकल हब शेंडा पार्कात 1100 बेडस्ची सुविधा

विल्यम इस्माईल कोण आहेत?

विल्यम इशमाईल हे सिंगापूरमधील उद्योजक आणि वित्त क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. ते सध्या MHC Digital Group मध्ये डायरेक्टर – बिझनेस डेव्हलपमेंट अँड ट्रेडिंग म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते ऑक्टोबर २०२२ पासून या कंपनीशी जोडलेले आहेत.

फायनान्स आणि ट्रेडिंग क्षेत्रात विल्यम यांना मोठा अनुभव आहे. एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये येण्यापूर्वी त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर आणि व्हाइस प्रेसिडेंटसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. याशिवाय त्यांनी जवळपास १० वर्षे UBS या गुंतवणूक बँकेतही काम केले आहे. विदेशी चलन (फॉरेक्स) आणि ट्रेडिंग मार्केटमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व मानले जाते.

शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, विल्यम यांनी University of York येथून इकॉनॉमिक्स आणि फायनान्स विषयात बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc.) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २००२ ते २००५ या कालावधीत आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news