

हरियाणवी गायक राहुल फजिलपुरियावर काल गोळीबार झाला. यात राहुल थोडक्यात वाचला आहे. हरियाणवी गायक राहुल फजिलपुरियावर गुरग्राममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. राहुल या यावेळी राहुल त्याच्या थार गाडीतून जात होता. राहुल याच्या गाडीवर गोळीबार करून हल्लेखोरांनी पळ काढला. राहुल प्रसिद्ध रॅपर आणि गायक आहे. तसेच तो एल्विश यादवचा अत्यंत घनिष्ट मित्र आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत
राहुल फजिलपुरियाचे खरे नाव राहुल यादव आहे. फजिलपुरिया हे त्याचे स्टेजवरील नाव आहे. त्याने आपल्या गावाच्या नावावर हे नाव ठेवले आहे. हे गाव गुरुग्राममध्ये येते. हरियाणवी संगीत बॉलीवूडपर्यंत पोहोचवण्यासाठी राहुल काम करतो. राहुलची एकूण संपत्ति 2.6 कोटी आहे. याशिवाय बलम का सिस्टम, रावसाहेब, 2 मेनी गर्ल्स, जिमी चू ही त्याची काही प्रसिद्ध गाणी आहेत.
राहुलला 2014 रॅप गाणे 'लडकी कर गयी चूल' हे गाणे राहुलने गायले आहे. आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा सिनेमा कपूर अँड सन्स या सिनेमासाठी राहुलने रॅपसॉन्ग गायले आहे. हरियाणवी संगीताचा बाज असलेली गाणी राहुल गाताना दिसतो.
राहुलने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जननायक जनता पार्टीकडून निवडणूक लढवली होती. तो भाजपाच्या मुकेश शर्मा यांच्याकडून पराभूत झाला होता. सोशल मिडियावर राहुलचे फॅन्स आहेत. इंस्टावर राहुलचे1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
घरात व्यवसायाची पार्श्वभूमी असूनही राहुलने संगीत क्षेत्रात नाव आजमावण्याचे ठरवले. राहुल हा बिग बॉस ott 2 चा विजेता एल्विश यादवच्या अत्यंत जवळचा मानला जातो.
2023 मध्ये एका रेव्ह पार्टीत सापांचे विषाचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी एल्विश यादववर कारवाईही झाली होती. या चौकशी दरम्यान विष पुरवणारी व्यक्ति म्हणून एल्विशने राहुलचे नाव घेतले होते