

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रसिद्ध अभिनेता हर्षवर्धन राणे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. जेव्हापासून त्याचा चित्रपट ‘सनम तेरी कसम’ रि-रिलीज झाला आहे, तेव्हापासून तो चर्चेत आहे. आता हर्षवर्धन राणेने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
खरंतर, हर्षवर्धन राणेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने तीन फोटोज शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत हर्षवर्धन राणे कॅमेऱ्याकडे पाहताना पोज देत आहे. दुसऱ्या फोटोत हर्षवर्धन राणे जिराफला (खेळणं) किस करत आहे. तिसऱ्या फोटोत तो खुर्चीवर बसून पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, हर्षवर्धन राणेच्या पायाला पट्टी बांधली आहे.
ही पोस्ट शेअर करत हर्षवर्धन राणेने कॅप्शनमध्ये लिहिलं की, मला जिराफ खूप आवडते...तो शानने चालतो. सोबतच जोहरात लाथदेखील मारतो. जिराफ प्रमाणेच जोरात लाथ मारताना माझ्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. आता अभिनेत्याच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्स देखील कॉमेंट्सच्या माध्यमातून आपापली प्रतिक्रिया देत आहेत.
हर्षवर्धन राणेचा चित्रपट ‘सनम तेरी कसम’ मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी मध्ये रि-रिलीज करण्यात आला होता. जेव्हा पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा हा चित्रपटा फारसा चालला नाही. पण दुसऱ्यांदा रिलीज झाला तेव्हा छप्परफाड कमाई केली.