Hardik Shubhechha Movie | पुष्कर जोग-हेमल इंगळेचा चित्रपट 'हार्दिक शुभेच्छा' येतोय

प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
Hardik Shubhechha Movie
पुष्कर जोग-हेमल इंगळेचा चित्रपट 'हार्दिक शुभेच्छा' येतोयInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरले. यात एका नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळत आहे. ही कथा प्रेक्षकांना नातेसंबंधातील एका महत्वाच्या पैलूशी जोडून ठेवेल.

“हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. हा चित्रपट २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोग यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच, या चित्रपटातही नात्यातील गुंतागुंत, भावनिक संघर्ष, आणि जीवनातील काही कंगोरे मांडण्यात आले आहेत. पुष्कर जोगचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच विचार करायला भाग पाडणारे असतात आणि हा चित्रपटही त्या परंपरेतून तयार झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दुबईसह ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये झाले असून खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिस मध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “आजच्या आधुनिक काळातही लैंगिक सुसंगतता हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नातेसंबंधांना फक्त भावनिक किंवा मानसिक बळ पुरेसं नसतं, तर शारीरिक सुसंगतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही हा विषय एका सहज पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट येत्या २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news