मागच्या वर्षी नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी लग्नाच्या नात्यातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्री, मॉडेलसोबत जोडले गेले.
पण आता तो नव्या नात्यात असल्याचे समोर येत आहे. तो अभिनेत्री मॉडेल माहिका शर्मासोबत नात्यात असल्याचे समोर येत आहे
हार्दिक माहिकासोबत असल्याच्या केवळ अफवाच होत्या. पण नुकत्याच त्यांच्या एकत्र दिसण्याने या अफवांवर शिक्कामोर्तब झाले आहे
हे दोघेही अलीकडे एयरपोर्टवर स्पॉट झाले. यापूर्वी हार्दिकचे नाव ब्रिटिश मॉडेल जॅस्मिन वालियासोबत जोडले जात होते.
विशेष म्हणजे हे दोघे एअरपोर्टवर स्पॉट झाले त्यावेळी या दोघांनीही ट्विनिंग केले होते.
माहिकाने ब्लॅक जॅकेट, ब्लॅक पॅंट, ब्ल्यु टी शर्टसोबत पेयर केले होते. या लूकसोबत पिंक बॅग आणि काळा गॉगलही तिने लावला होता
तर हार्दिक ब्लु टी शर्ट ब्लॅक जॅकेट, पॅन्ट कॅरी करताना दिसला.
ही जोडी कुठे चालली आहे हे मात्र समोर आलेले नाही.