Hardeek- Akshaya : हार्दिक- अक्षयाची लगीनघाई सुरू; पहिलं केळवण पार पडलं

Hardeek- Akshaya
Hardeek- Akshaya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादा आणि अंजली खऱ्या आयुष्यात लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. राणादा म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी आणि अंजली म्हणजे, मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी याआधी धुमधडाक्यात साखरपुडा उरकला आहे. Hardeek- Akshaya साखरपुढ्याचे आणि त्यानंतर लंडनच्या ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. सध्या दोन्हीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच नुकतेच कोकणात पहिलं केळवण पार पडलं आहे. यावेळी अक्षया निळ्या रंगाच्या साडीत आणि हार्दिक निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये एकदम हॅडसम दिसला. दोघांनी मॅचिंग कपडे घालून कपलगोल्स दाखवून दिले आहे. शेअर झालेल्या फोटोत दोघांच्या पुढे पंचपकवानचे ताट दिसतेय. यासमोर सुंदर रांगोळी आणि आरतीचे ताटदेखील दिसतेय. तर यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भऱभरून कॉमेन्टस करताना आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी हार्दिक आणि अक्षयाने साखरपुडा उरकल्यानंतर दोघेजण लंडनमध्ये सुट्यांचा आनंद लुटताना दिसले. यावेळचे काही फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला होतो. आता हे कपल लग्न कधी करणार? यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतु, अध्याप हार्दिक – अक्षया यांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही. ( Hardeek- Akshaya

मिळालेल्या माहितीनुसार, साखरपुढा आणि केळवण या दोन्ही कार्यक्रमानंतर हे कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या लग्नासाठी दोन्हीकडे जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तर हार्दिक आणि अक्षया हे कपल बिग बॉस मराठीच्या ९ सीझनमध्ये दिसणार असल्याची ही चर्चा होत आहे. याशिवाय दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे हटके फोटोज शेअर करत असतात.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news