Financial advisors : श्रीमंत होण्‍याचे स्‍वप्‍न पाहताय? मग ‘ही’ पुस्‍तके वाचायलाच हवीत…

Financial advisors : श्रीमंत होण्‍याचे स्‍वप्‍न पाहताय? मग ‘ही’ पुस्‍तके वाचायलाच हवीत…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : श्रीमंत होण्‍याचे स्‍वप्‍न सारेच पाहतात.मात्र बहुतांश जणांसाठी ते दिवास्‍वप्‍नच ठरते. त्‍याचे कारणही तसेच आहे. श्रीमंत होण्‍यासाठी तुम्‍हीअचूक गुंतवणूक करण्‍याबराेबरच नैतिक मूल्‍य, कठाेर मेहनत आणि बदलणार्‍या गाेष्‍टींचा अचूक अंदाज तुम्‍हाला आवश्‍यक असताे; मग याचे मार्गदर्शन कोण करणार? यासाठी आर्थिक विषयावर अचूक मार्गदर्शन करणारी खूप सारी पुस्‍तके बाजारात उपलब्‍ध आहेत. यातील काही निवडक पुस्‍तके उत्‍पादन व्‍यवस्‍थापन, विपणन ( मार्केटिंग) धोरण आणि व्‍यवस्‍थापन सल्‍ला क्षेत्रातील तज्‍ज्ञ प्रियंक आहुजा यांनी सूचवली आहेत. व्‍यक्‍तिगत गुंतवणूक व आर्थिक नियाेजनाबाबत ( Financial advisors ) मार्गदर्शन करणारी ही १० पुस्‍तके आणि यामध्‍ये असणार्‍या आशयाची तोंडओळख करुन घेवूया…

१) रिच डॅड पुअर डॅड

रिच डॅड पुअर डॅड हे आर्थिक गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारे हे उत्‍कृष्‍ट पुस्‍तक आहे. याचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी. हे पुस्‍तक दोन वडिलांची पैशासंदर्भात मानसिकता स्‍पष्‍ट करते. एक श्रीमंत तर दुसरा गरीब, असे का? या प्रश्‍नाचे उत्तर हे पुस्‍तक तुम्‍हाला देते. तसेच हे पुस्‍तक तुम्‍हाला संपत्ती आणि जबाबदारी यातील फरक ओळखण्‍यास मदत करते.
रॉबर्ट कियोसाकी हे अमेरिकेतील ख्‍यातनाम उद्‍योजक आणि लेखक आहेत. तसेच ते रिच ग्‍लोबल एलएलसी अँड रिच डॅड कंपनीचे संस्‍थापकही आहेत. ही कंपनी व्‍यक्‍तिगत गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करते. तसेच आबालवृद्धांना आर्थिक साक्षर करण्‍यासाठी सॉप्‍टवेअर गेमचे निर्माताही ते आहेत.

२) Financial advisors : द सायकॉलॉजी ऑफ मनी'

'द सायकॉलॉजी ऑफ मनी' या पुस्‍तकाचे लेखक आहेत मॉर्गन हाऊसेल. आर्थिक गुंतवणूकदार आणि ख्‍यातनामस्‍तंभ लेखक अशी त्‍यांची ओळख आहे. हे पुस्‍तक तुम्‍हाला आर्थिक गुंतवणुकीबाबत सखोल मार्गदर्शन करते. पैशाचे मानसशास्‍त्र कसे आहे? याचीही माहिती देते. पैसे कमविण्‍यासाठी तुमचे स्‍वत:चे मत, बाह्य घटक आणि भावना हे परस्‍परपूरक कसे आहे, याचीही ते माहिती देतात.  मानसशास्‍त्राचा विचार करुन तुम्‍ही जेवढे विनयशील म्‍हणजे नम्र राहाल तेवढे तुमच्‍याकडे संपत्ती अधिक, या विचाराची मांडणीही त्‍यांनी अभ्‍यासपूर्णपणे केली आहे. पैशाचे व्‍यवस्‍थापन कसे करावे. यासाठी गुंतवणुकीच्‍या वाढीसाठी द्‍यावा लागणारा अवधी, पैशाचा सदुपयोग, तसेच आर्थिक गुंतवणूक करताना तुमचे सर्वस्‍वच संपून जाईल अशी गुंतवणूक करु नये, पैशाकडे पाहताना तुमचा दृष्‍टीकोनच बदलून टाकणारे हे पुस्‍तक तुम्‍हाला नक्‍कीच आर्थिक गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्‍यावी व आर्थिक फायदा कसा कमवावा याचे मार्गदर्शन करते.

३) व्हॉट एव्‍हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टिंग

व्हॉट एव्‍हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टिंग या पुस्‍तकाचे लेखक आहेत विनोद पोतायिल. वैयक्तिक गुंतवणूकदारांच्‍या मनातील सर्व शंका दूर करण्‍याचा प्रयत्‍न लेखकाने या पुस्‍तकात केला आहे. विशेषत: भारतीय गुंतवणूकदार आणि बाजारपेठ याचा विचार करुन याची मांडणी करण्‍यात आली आहे. गुंतवणुकीचे फायदे, तोटे, कररचना यासह मुदतठेव ते पीपीएफ आणि बांधकाम क्षेत्र, सोने, म्युच्युअल फंड, शेअर बाजार या सर्वांमधील गुंतवणुकीचे सविस्‍तर विवेचन या पुस्‍तकात करण्‍यात आले आहे.

४) Financial advisors : थिंग अँड ग्रो रिच

थिंग अँड ग्रो रिच या पुस्‍तकाचे लेखक आहेत निपोलियन हिल. विचार करा आणि श्रीमंत व्‍हा, असा संदेश देणारे हे पुस्‍तक आहे. मात्र याचा मथळा वाचल्‍यानंतर तुम्‍हाला प्रश्‍न पडेल की, विचार आणि श्रीमंती याचा संबंध आहे काय? विचार व्‍यक्‍तीला श्रीमंत आणि गरीब करतो हे नियोलियन हिल स्‍पष्‍ट करतात. आर्थिक बाबतीत अपयशाचा सामना करावा लागतो. मात्र यानंतरही तुम्‍ही कसा विचार करता, अपयशातून काय शिकता? यावर हे पुस्‍तक भाष्‍य करते. यामध्‍ये तुमचे विचार तुम्‍हाला कसे श्रीमंत करतील, या संदर्भातील काही सिद्धांत मांडले आहेत. यासाठी जगातील श्रीमंत व्‍यक्‍तींच्‍या मुलाखती त्‍यांनी घेतल्‍या. तसेच जग बदलणारे लोक हे जन्‍मत:च बुद्धीमान  नसतात. नैसर्गिक प्रतिभा असे काही नसते.  कोणीही एका रात्रीत यशस्‍वी आणि श्रीमंत व्‍यक्‍ती होत नाही. तुम्‍हाला यशस्‍वी आणि श्रीमंत व्‍हायचे असेल तर कठोर मेहनत हाच मंत्र आहे, हेही हे पुस्‍तक स्‍पष्‍ट करते.

५) द रिचेस्‍ट मॅन इन बॅबिलोन

द रिचेस्‍ट मॅन इन बॅबिलोन या पुस्‍तकाचे लेखक आहेत जॉर्ज एस. क्‍लेसन. तुम्‍हाला जर कथा आणि कादंबरी वाचायला आवडत असेल तर या माध्‍यमातून तुम्‍ही आर्थिक गुंतवणुकीबद्‍दल या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून  जाणून घेता. पैशाबद्दलच्या खूप सोप्‍या संकल्‍पना शिकण्‍यासाठी तुम्‍ही प्राचीन काळातील ज्ञानाचाही वापर करावा, असेही हे पुस्‍तक सूचवते.  कोणताही देश हा श्रीमंत होतो तो तेथील नागरिकांच्‍या विचारांवरच. महत्त्‍वाकांक्षी लोक कसा विचार करतात? बॅबिलेानमध्‍ये प्राचीन काळी पैसे मिळविण्‍यासाठी मूलभूत सिद्धांतांची ओळख करुन देणारे हे पुस्‍तक आहे. याच्‍या मार्गदर्शनातून आर्थिक गुंतवणुकीमधील समस्‍या आणि समाधान या दोन्‍हींची ओळख तुम्‍हाला होईल. जगभरातील हजारो वाचकांनी या पुस्‍तकावर आपलं सकारात्‍मक व्‍यक्‍त केले आहे.

६) Financial advisors : लेस्‍ट टॉक अबॉउट मनी

लेस्‍ट टॉक अबॉउट मनी या पुस्‍तकाची लेखिका आहेत मोनिका हालान. भारतीय गुंतवणूकदार आणि बाजारपेठाचा विचार करुन आर्थिक गुंतवणुकीचे मार्गदर्शन हे पुस्‍तक करते. तसेच अचूक गुंतवणुकीसाठीचे व्‍यावहारिक मार्गही सांगते.

७) द मिलिनिअर नेक्‍स्‍ट डोअर

द मिलिनिअर नेक्‍स्‍ट डोअर या पुस्‍तकाचे लेखक आहेत थॉमस जे. स्‍टॅनली. तरुणांना आर्थिकबाबतीत मार्गदर्शन करणारे हे एक उत्‍कृष्‍ट पुस्‍तक आहे. आज आर्थिक नियोजनाचे प्राथमिक व सामान्‍य धडेच गुंतवणूकदार विसरले आहेत. याचा पुनरुच्‍चार हे पुस्‍तक करते. आज हे सामान्‍य ज्ञान वाटत असेल तरी तरुणाईसाठी हे आर्थिक नियोजनाचे धडे खूपच महत्त्‍वपूर्ण आहेत.

८) द फोर अवर वर्क वीक

द फोर अवर वर्क वीक या पुस्‍तकाचे लेखक आहेत टीमोथी फेरीस. हे पुस्‍तक तुम्‍हाला वेळ, पैसा आणि उत्‍पादकता याविषयी तुमच्‍या मूळ कल्‍पनाच खोडून काढते. तसेच याबाबत तुम्‍हाला पुनर्विचार करण्‍यास भाग पाडते. तुम्‍हाला अपेक्षित असणारी जीवनशैली जगण्‍यासाठी पुरेसे पैसे मिळविण्‍याबाबत उपाय शोधण्‍यासही हे पुस्‍तक प्रवृत्त करते. श्रीमंत होण्‍यासाठी पारंपरिक पद्‍धतीने आर्थिक गुंतवणुकीचा विचार करु नका, असेही सूचवते.

९) आय विल टिच यू टू बी रिच

आय विल टिच यू टू बी रिच या पुस्‍तकाचे लेखक आहेत रमित सेठी. हे पुस्‍तक तुम्‍हाला खर्च-बचत आणि गुंतवणूक यावर सखाेल मार्गदर्शन करते. तुमचे आर्थिक व्‍यवस्‍थापन कसे असावे, याचेही विवेचन करते. तसेच आर्थिक नियोजनाची सुरुवात तुम्‍ही जेवढी लवकर कराल तेवढा फायदा, तुम्‍ही किती बचत कराल याचा एक मर्यादा आहे. मात्र तुम्‍ही किती पैसे कमवाल याला मर्यादा नाही, असा मूलभूत मंत्र देणारे पुस्‍तक तुमची आर्थिक शिस्‍त अधिक चांगली करण्‍यास निश्‍चित मदत करते.

१०) कॉफी कॅन इनव्‍हेटिंग

कॉफी कॅन इनव्‍हेटिंग या पुस्‍तकाचे लेखक आहेत प्रणव उनियाल, रक्षित रंजन आणि सौरभ मुखर्जी. तुम्‍ही सर्वोत्तम व्‍यवसाय कसे निवडायचे आणि दीर्घकालीन गुंतवणूकीचे धोरण कसे राबवावे, याचे मार्गदर्शन हे पुस्‍तक करते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news