HBD Saif Ali Khan | ८०० कोटींचं पतौडी पॅलेस, लक्झरी गाड्या ते पॉश बंगले अन्‌ बरंच काही..सैफ अलीची संपत्ती आहे तरी किती?

HBD Saif Ali Khan | ८०० कोटींचं पतौडी पॅलेस, लक्झरी गाड्या ते पॉश बंगले अन्‌ बरंच काही..सैफ अलीची संपत्ती आहे तरी किती?
image of Saif Ali Khan
Happy Birthday Saif Ali Khan Instagram
Published on
Updated on

Happy Birthday Saif Ali Khan net worth details

मुंबई - चित्रपट जगतातील श्रीमंत कलाकारांच्या यादीत सैफ अली खानचे नाव घेतले जाते. अभिनयाचा वारसा लाभलेला अभिनेता सैफच्या संपत्तीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर केवळ बंगले, गाड्याच नाही तर त्याचे इतर कमाईचे स्त्रोत आहेत. ज्यामधून तो कोटींची कमाई करतो. इतकेच नाही तर त्याच्याकडे स्वत:ची प्रोडक्शन कंपनी आहे, ज्यामधून चित्रपट निर्मिती होते, जी एक कमाईचा स्त्रोत आहे.

Saif Ali Khan
Saif Ali Khan Instagram

प्रोडक्शन बॅनर

रिपोर्टनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत, सैफ अली खानची एकूण संपत्ती जवळपास १,२०० कोटींच्या जवळपास आहे. सैफ अली खानकडे दोन प्रोडक्शन बॅनर आहेत- इलुमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाईट फिल्म्स. या प्रोडक्शन बॅनर अंतर्गत अनेक यशस्वी प्रोजेक्ट्स देखील बनवण्यात आले आहेत.

image of Saif Ali Khan
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah |हास्याचा नवा फवारा! 'गोकुळधाम'मध्ये येतंय नवं राजस्थानी कुटूंब; बनणार जेठालालचा प्रतिस्पर्धी?
Saif Ali Khan -kareena
Saif Ali Khan -kareenaInstagram

चित्रपट

सैफ चित्रपटातून चांगली कमाई करतो. अनेक जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूकीतून तो चांगली कमाई करतो. तो एका चित्रपटासाठी १०-१५ कोटी रु. कमावतो.

Instagram

८०० कोटींचे पतौडी पॅलेस

हरियाणातील गुरुग्राममध्ये वडिलोपार्जित पतौडी पॅलेस आहे. ज्याची किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे. या हवेलीला 'इब्राहिम कोठी' नावाने देखील ओळखले जाते, जे १० एकरमध्ये आहे. पतौडी पॅलेसमध्ये अनेक बॉलीवूड - हॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

image of Saif Ali Khan
War 2 - Coolie Collection | 'वॉर-२'ची ट्रेन सुसाट; 'कुली'चीही शानदार कमाई; 'महावतार नरसिंह'चे आकडे किती?
Saif Ali Khan with sons
Saif Ali Khan with sonsInstagram

सैफकडे बांद्रामध्ये दोन घरे आहेत. एका अपार्टमेंट्चे नाव सतगुरु शरण अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत १०३ कोटी रुपये सांगितली जाते. दुसरीकडे बॉलीवूड स्टार सैफ त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर आणि मुलांसमवेत मुंबईतील बांद्रामध्ये एका आलीशान घरात राहतो. खान फॅमिली २०२१ मध्ये फॉर्च्यून हाईट्समध्ये आपले घर सोडून या घरात शिफ्ट झाले होते. शिवाय, स्विट्जरलँडच्या गस्ताद (Gstaad) लक्झरी हाऊस असल्याचे सांगितले जाते, त्याची किंमत ३३ कोटी रुपये आहे.

Saif Ali Khan family
Saif Ali Khan familyInstagram

गुंतवणूक

विविध व्यवसाय आणि रियल इस्टेटमध्ये तो गुंतवणूक करतो

Saif Ali Khan -kareena
Saif Ali Khan -kareenaInstagram

अन्य

त्याच्याकडे हाऊस ऑफ पटौदी नावाने एक फॅशन ब्रँड देखील आहे. तो एका रेस्टॉरंटचा मालक देखील आहे.

Saif Ali Khan -kareena
Saif Ali Khan -kareenaInstagram

लक्झरी कार्सचा मालक

सैफकडे अनेक लक्झरी कार्स आहेत, ज्यामध्ये ऑडी आर8, लँड रोवर डिफेंडर, रेंज रोवर वोग, मर्सिडीज-बेंज एस-क्लास (एस450), फोर्ड मस्टँग जीटी, जीप ग्रँड चेरोकी ट्रेलहॉकचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news