Gulkand Movie | समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र

समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र
Gulkand Movie
समीर चौघुले आणि सई ताम्हणकर प्रथमच एकत्र काम करणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व वेलक्लाउड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा फॅमकॉम चित्रपट आहे. चित्रपटात प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.

समीर चौघुले म्हणतात, “सई आणि माझी ओळख ‘फू बाई फू’ पासूनची आहे, त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो, परंतु कधीच एकत्र काम केलं नव्हतं. हास्यजत्रेत हास्यरसिक म्हणून ती आमचे स्किट्स बघते, त्यावर प्रतिक्रिया देते. जवळ जवळ ९०० एपिसोड्स तिने पाहिले आहेत. आता ‘गुलकंद’च्या निमित्ताने तिच्यासोबत काम करण्याचा योग आला आणि मी यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि चांगली मैत्रीण आहे.”

सई ताम्हणकर म्हणते, “हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहाणं आणि त्याच्यावर टिप्पणी करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे, कारण त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. त्याच्या कॅरॅक्टरसारखाच तो खूप भोळा आणि विनम्र असल्यामुळे आमचं खूप जमतं. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. तो खरा जेंटलमॅन आहे आणि मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news