

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे अभिनेता गोविंदा यांच्या बाबत एक वृत्त समोर आले आहे. गोविंदा नव्वदीच्या शतकातील सुपरस्टार्सपैकी एक आहेत. राजा बाबू, दूल्हे राजा, दिवाना मस्ताना, आंखें, कुली नंबर १ यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता बॉलिवूडमधील अभिनेता कमाल आर खान (केआरके)ने गोविंदा यांच्या विषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
केआरकेने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. केआरकेने त्या व्हिडिओ त म्हटलं आहे की, गोविंदा यांनी स्वत:चं करिअर खराब केलं आहे. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कुणालाही त्यांच्या डाऊनफॉलसाठी दोषी ठरवलं जाऊ शकत नाही. केआरकेने हेदेखील म्हटलं आहे की, गोविंदा मानसिकरित्या अस्वस्थ आहे. केआरकेने इन्स्टाग्राम हँडलवर आपला व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो म्हणताना दिसत आहे की, ‘बॉलीवूडमध्ये असे खूप लोक आहेत, ज्यांचं म्हणणं आहे की, गोविंदा मेंटली डिस्टर्ब झाले आहेत. त्याचे कृत्य पाहून लोक घाबरतात.’
केआरकेने म्हटलं, ‘जेव्हा गोविंदा मनी है तो हनी है (२००८) चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा ते सेटवर गणेश आचार्यला म्हटले होते की, आज मी पूर्ण दिवस कोंबडी सोबत शूटिंग करेन, कारण, माझ्या गुरुजींनी असं सांगितलं आहे. जर मी असे करेन तर चित्रपट सुपरहिट होईल. माहिती नाही. केआरकेने पुढे म्हटलंय- त्यांनी इतक्या अंगठ्या, माळा आणि हातात किती धागे बांधले आहेत. ते पूर्णपणे मेंटल डिस्टर्ब झाले आहेत.’
यानंतर केआरकेने दावा केला की, गोविंदा चित्रपट लाईफ पार्टनर (२००९) चे शूटिंग करत होते. तेव्हा उपस्थित एकाने सांगितले की, गोविंदा यांनी असं काही केलं होतं की, संपूर्ण टीम घाबरली होती. गोविंदा यांनी भाऊ कीर्तिला सेटवर आई निर्मला देवीला आणण्यासाठी सांगितले. खरंतर १९९६ मध्ये निर्मला देवी यांचे निधन झाले आहे. भाऊ कीर्ति आले आणि त्यांनी कारचे गेट असे उघडले की, त्यांची आई कारमधून उतरत आहे. कीर्तिनेही असं काही कृत्य केलं की, त्यांची आई तिथे उपस्थित आहे. यानंतर गोविंदा खाली खुर्चीवर बसून आपल्या दिवंगत आईशी दोन दोन तास बातचीत करायचे. त्यावेळी चित्रपटाचे संपूर्ण युनिट घाबरले होते.
केआरकेने या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टींमागे सत्य काय हे केवळ स्वत: अभिनेते गोविंदाच सांगू शकतात.