बिग बॉस मराठीची ही ट्रॉफी तुझीच होती; जेनेलियाची सूरजसाठी खास पोस्ट

Bigg Boss Marathi 5 | स्वप्ने मोठी पाहा; जेनेलियाची सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट
bigg boss marathi 5
बिग बॉस मराठी -5 जिंकल्यानंतर जेेनेलियाची खास पोस्टinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाचव्या सिझनचा विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. यावेळी बिग बॉसच्या शोचा होस्ट रितेश देशमुखची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुखदेखील मागे राहिली नाही. तिने सूरज चव्हामसाठी एक खास पोस्ट लिहिली.

जेनेलियाने पोस्टमध्ये काय म्हटलं?

जेनेलियाने इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करून एक मेसेज लिहिला आहे.

जेनेलियाने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं - ‘यातूनच स्वप्ने बनतात, मोठी स्वप्ने पाहा. बिग बॉस मराठीची ही ट्रॉफी तुझीच होती.’

यानंतर तिने रितेश देशमुखसाठीही दोन ओळी लिहिल्या आहेत. ‘रितेशचे होस्टींग सुरु असताना टीआरपीहीत हा शो वर होता. तू ज्या पद्धतीने हा शो पुढे नेलास, ते कमालीचं होतं. तू बेस्ट आहेस’ असं तिने म्हटलं.

ग्रँड फिनालेमध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांना मागे टाकत सूरज विजयी झाला. रितेश देशमुखने अंतिम सोहळा होस्ट केला. यावेळी फिनाले पाहण्यासाठी जेनेलिया देशमुखदेखील तिथे पोहोचली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news