Dashami Movie | गौरी इंगवलेचा भन्नाट ठेका, ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’चा भन्नाट स्वॅग; ‘दशमी’मधील हटके गाणे पाहाच

Dashami Movie | गौरी इंगवलेचा भन्नाट ठेका, ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’चा भन्नाट स्वॅग; ‘दशमी’मधील हटके गाणे पाहाच
Dashami Movie song
singer Nakash Aziz song out from Dashami MoviePudhari photo
Published on
Updated on

रिक्षाच्या मागे किंवा दुकानांच्या भिंतीवर लिहिलेली ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. आता याच लोकप्रिय वाक्याला एका भन्नाट गाण्याचा अंदाज देत आगामी मराठी चित्रपट ‘दशमी’मध्ये सादर करण्यात आलं आहे. देसी शब्दांचा भन्नाट वापर, जोशपूर्ण संगीत आणि नशा चढवणारा ठेका यामुळे हे गाणं सध्या चर्चेत आलं आहे.

‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ असे या गाण्याचे बोल आहेत. नकाश अझीझ यांच्या दमदार आवाजामुळे गाण्यातील ऊर्जा आणखी वाढली आहे. सुरेश पंडित यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, वैभव देशमुख यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. गाणं ऐकताच ताल धरावासा वाटणारा ठेका आणि त्याची भन्नाट मांडणी हे या गाण्याचं खास वैशिष्ट्य ठरत आहे.

गौरी इंगवलेसह कलाकारांचा भन्नाट ठेका

या गाण्यात अभिनेत्री गौरी इंगवले, राज कुंदन, तसेच अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विजय निकम यांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. चौघेही गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत.

Dashami Movie song
Aarti Solanki On Vidyanand Bapat : ‘माजोरडे, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना वाटतंय...’; विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवर आरती सोलंकीची टीकात्मक पोस्ट

‘दशमी’कडून वेगळ्या विषयाची अपेक्षा

‘दशमी’ हा चित्रपट आपल्या विषयामुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या हटके गाण्यामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष आणखी वेधलं गेलं आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे.

अन्यायाविरोधात उभं राहण्याचा संदेश

‘दशमी’ची कथा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून त्यातून एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अन्याय, संघर्ष आणि सत्याची परीक्षा येते. अशा परिस्थितीत अडचणींसमोर हार न मानता सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य दाखवणारी ही कथा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Dashami Movie song
Maamla Legal Hai Actress: वकिली सोडून मुंबईत आली! 'तू अभिनेत्री दिसत नाहीस...; म्हणत मिळाला नकार; पण हार न मानता गाठलं यश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news