Gashmeer Mahajani | गश्मीर महाजनीची दिग्दर्शनात दमदार एंट्री! ‘राखणदार’चं पहिलं पोस्टर पाहून वाढलं कुतूहल

Gashmeer Mahajani | गश्मीर महाजनीची दिग्दर्शनात दमदार एंट्री! ‘राखणदार’चं पहिलं पोस्टर पाहून वाढलं कुतूहल
Gashmeer Mahajani
Gashmeer Mahajani directorial debute Pudhari photo
Published on
Updated on
Summary

अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा गश्मीर महाजनी आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. त्याच्या आगामी ‘राखणदार’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच समोर आलं असून त्यातील आशय आणि मांडणीने सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गश्मीरच्या दिग्दर्शकीय पदार्पणामुळे ‘राखणदार’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारा गश्मीर महाजनी आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. गश्मीरच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा होताच त्याचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पोस्टरमधील रक्तरंजित दृश्य, सिंहाची प्रतिमा आणि त्यावर लिहिलेलं एक गूढ वाक्य यामुळे चित्रपटाची कथा नेमकी काय असणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

Gashmeer Mahajani
Lopamudra Raut theft case - बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 76 लाखांची चोरी; फरार चोरट्याला बिहारमधून अटक

‘राखणदार’मध्ये गश्मीर महाजनीसोबत सई ताम्हणकर आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सिंहाची डरकाळी आणि रक्तरंजित पोस्टर

‘राखणदार’च्या पहिल्या पोस्टरची रचना अतिशय वेगळी आहे. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचे शिंतोडे दिसतात. पोस्टरच्या मध्यभागी डरकाळी फोडणाऱ्या सिंहाचा उग्र चेहरा दाखवण्यात आला आहे. त्याखाली एका बलदंड व्यक्तीची आकृती दिसते.

पोस्टरवरील ‘राखणदार’ हे शीर्षकही ठळकपणे मांडण्यात आलं आहे. मात्र, पोस्टरमधील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे लहान मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेलं वाक्य-‘माझा आवडता प्राणी - माझे बाबा’.

या एका वाक्याने चित्रपटाबद्दलचं गूढ आणखी वाढवलं आहे. ही कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे का? सिंह आणि त्या व्यक्तीचा कथेशी काय संबंध आहे? पोस्टरमध्ये रक्तरंजित वातावरण का दाखवण्यात आलं आहे? ‘राखणदार’ नेमका कोणाचा आणि कशापासून रक्षण करतो? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

गश्मीरने सांगितलं पोस्टरमागचं कारण

दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल गश्मीर महाजनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्याच चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण व्हावं, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे पोस्टरमधील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निवडण्यात आल्याचं त्याने सांगितलं.

Gashmeer Mahajani
Varanasi Mahesh Babu's look| ‘वाराणसी’मध्ये महेश बाबूचा रुद्र अवतार! आफ्रिकेच्या जंगलात दिसला दमदार लूक

गश्मीरच्या म्हणण्यानुसार, पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात यावं, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट गश्मीरने आपल्या वडिलांना समर्पित केला आहे. .

२०२७ मध्ये उलगडणार ‘राखणदार’चं गूढ

गश्मीर महाजनी अभिनयातून दिग्दर्शनाकडे वळला आहे. सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे आणि गश्मीर महाजनी अशी दमदार स्टारकास्ट, त्यासोबत गूढ आणि रहस्यमय पोस्टर यामुळे ‘राखणदार’ची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय असणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांना आता २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news