Fuss class Dabhade movie | ‘झिम्मा २’ नंतर हेमंत ढोमेंनी केली ‘फसक्लास दाभाडे’ची घोषणा

‘फसक्लास दाभाडे’ यादिवशी प्रदर्शित होणार
Fuss class Dabhade movie
अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा नवा चित्रपट येत आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि चलचित्र मंडळी पुन्हा एकदा त्यांचा पुढील प्रमुख मराठी चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ असे या चित्रपटाचे नाव आहे. बॉक्स ऑफिसवर ‘झिम्मा २’ च्या यशानंतर, हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. शीर्षकाची आणि प्रदर्शनाच्या तारखेची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, फसक्लास दाभाडे १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

टी सिरीज फिल्म्स आणि आनंद एल राय प्रस्तुत, भूषण कुमार, आनंद एल राय, क्षिती जोग आणि क्रिशन कुमार निर्मित, ‘फसक्लास दाभाडे’ ही वेड्या भावंडांची एक विलक्षण कथा असून सोशल मीडियावर निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आणला आहे.

हेमंत ढोमे लिखित या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत असून अमेय वाघने मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. कलर यल्लो आणि चलचित्र मंडळीची निर्मिती भावंडांच्या बंधांचा एक विनोदी पद्धतीने आणि मनापासून शोध घेत असल्याचे दिसतेय.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “झिम्माच्या टीमकडून, वेड्या भावंडांची एक विलक्षण कथा...सोनू, पप्पू, तायडी आणि त्यांचे तितकेच वेडे पण हृदयस्पर्शी कुटुंब. १५ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!”

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “फसक्लास दाभाडे' ही एक अशी कथा आहे, जी भावंडांच्या नात्यातील गुंतागुंत सुंदरपणे मांडते. हा अशा बंधनाचा उत्सव आहे, जिथे प्रेम, शत्रुत्व आणि विनोद आनंदीपणे एकत्र राहतात. हेमंत ढोमे यांनी या अनोख्या भावंडाची कहाणी अतिशय मोहकतेने आणि नातेसंबंधाने जिवंत केली आहे आणि कलर यलो प्रॉडक्शनच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा मला अभिमान आहे. मला खात्री आहे की, हा चित्रपट अनेकांना जवळचा वाटू शकतो, ज्याने कधीही भावंडासोबत हे विशेष बंध शेअर केले आहेत.”

निर्माते भूषण कुमार म्हणतात, ''फसक्लास दाभाडे' नात्यांमधील मानवी भावनांचे अतिशय साधेपणाने चित्रण करणारा सिनेमा आहे. हा चित्रपट त्याच्या मानवी कथानकाद्वारे खोलवर जोडतो. भारतातातील, विशेषतः महाराष्ट्रातील कौटुंबिक जीवन प्रतिबिंबित करणाऱ्या या सिनेमाची दोलायमान संस्कृती आणि हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा घेऊन येणारी आहे.''

हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिले ते सगळे मी यात मांडायचा प्रयत्न केला आहे. कोणीतरी असे म्हणाले आहे, सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो. चित्रपट बनवताना ठरवले होते, हा चित्रपट आपल्या गावीच स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत चित्रित करायचा आणि विशेष म्हणजे माझ्या लाडक्या टीमसोबत माझी ही इच्छा पूर्णदेखील झाली. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून १५ नोव्हेंबर रोजी तो तुमच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे

‘फसक्लास दाभाडे’ हा टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे ज्यामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांचे रियुनियन होणार आहे.

Fuss class Dabhade movie
Janhvi Kapoor : सिंपल लूकमध्ये जान्हवी तिरुपतीच्या दर्शनाला (video)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news