

हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटातील कंटेंटमुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि सामाजिक सलोखा बिघडला आहे.
FIR on Ghooskhor Pandat film director and team
मनोज वाजपेयींचा आगामी/चर्चेत असलेला चित्रपट ‘घूसखोर पंडित’ सध्या वादात सापडला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि टीमविरोधात FIR दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागील नेमके आरोप काय आहेत आणि त्याचा चित्रपटावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘घूसखोर पंडित’ हा चित्रपट त्याच्या नावामुळे आणि विषयामुळे आधीपासूनच चर्चेत होता. मनोज वाजपेयी यांच्यासारखा दमदार अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, आता चित्रपट अडचणीत आला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, आगामी 'घुसखोर पंडत' या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि टीमवर शुक्रवारी लखनौमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले. लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. चित्रपटात धार्मिक आणि जातीतत भावनांना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप आहे की, चित्रपटाच्या आशयामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि सामाजिक सलोखा बिघडला आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने अधिकृत कारवाई केली आहे.
सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या चित्रपटाचा आशय आक्षेपार्ह, जातीयवादी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारा असल्याचे आढळले. त्यानंतर हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नोंदवलेल्या एफआयआरमध्ये निरीक्षकांनी नमूद करण्यात आले आहे की, वेब सीरिजचे शीर्षक आणि आशय एका विशिष्ट समुदायाला (जातीला) अपमानित आणि मानहानी करण्याच्या उद्देशाने लक्ष्य करतो. अनेक सामाजिक संघटना चित्रपटाच्या नावावरून आणि आशयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्यांनी या चित्रपटाविरुद्ध हिंसक निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
मनोज वाजपेयीने लिहिलं की-
दरम्यान, मनोज वाजपेयीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'घूसखोर पंडत' विषयी होणाऱ्य़ा वाद आणि FIR नंतर पोस्ट केलं आहे. त्यांनी लिहिलं, "मी लोकांच्या भावनांचा आदर करतो आणि त्यांना गांभीर्याने घेतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा भाग असता आणि ते एखाद्याला दुखावते तेव्हा ते तुम्हाला थांबून ऐकण्यास भाग पाडते. एक अभिनेता म्हणून, मी ज्या पात्रातून आणि कथेतून साकारत आहे त्यातून येतो."