बाप-लेकाची जोडी करणार धमाल, प्रसाद-श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’मध्ये एकत्र

Chiki Chiki Booboom Boom | प्रसाद-श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’मध्ये एकत्र दिसणार
Chiki Chiki Booboom Boom
प्रसाद खांडेकर-श्लोक खांडेकर एकत्र चित्रपटात दिसणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे.

आठ वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणार? हे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकाने अतिशय सफाईदारपणे केल्याने लेकाचा अभिमान आहे, असे प्रसाद खांडेकर सांगतो.

या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.

धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news