

पुढारी ऑनलाईन डेस्क - निर्माती फराह खानने होळीवर वादग्रस्त दिल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. फरहाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. हिंदुस्तानी भाऊने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
रिपोर्टनुसार, बॉलीवूड चित्रपट निर्माती फराह खानने होळी सणावर वादग्रस्त कॉमेंट केली. तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. तिच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ नावाने प्रसिद्ध विकास पाठकने वकिलाद्वारे तक्रार दाखल केलीय. २० फेब्रुवारी रोजी एका शो च्या एपिसोडमध्ये फराहने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तक्रारीत विकास पाठकने दावा केला की, फराह खानने होळीला ‘छपरियों का त्योहार’ म्हटलं.