Esha Dey | 'मेहंदीच्या पानावर..' हास्यजत्रा फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात नवा टप्पा? वनिता खरातसोबतचा खास फोटो व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra actress Esha Dey wedding | 'मेहंदीच्या पानावर..' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे लग्न करतेय! वनिता खरातसोबतचा खास फोटो व्हायरल
Esha Dey
Maharashtrachi Hasyajatra actress Esha Dey wedding instagram
Published on
Updated on
Summary

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री ईशा डे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री वनिता खरातने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केल्यानंतर ही बातमी समोर आली.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे लग्न करणार असल्याची आनंदाची वार्ता समोर आलीय. सोशल मीडियावर तिची सहकलाकार, अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मेहंदीचा फोटो अपलोड करत गुड न्यूज दिलीय. आमच्या ईशाची मेहंदी अशी कॅप्शन देत वनिताने ईशासोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

Esha Dey
Salman Khan : सलमानच्या एका झलकसाठी तुफान गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीमार(Video)

दरम्यान, ईशाचे ग्रहमख विधीचे फोटो व्हायरल झाले आहेत. ईशाची मैत्रीण आणि कुटुंबियांनी अभिनेत्रीचे हे लग्नाआधीचे विधी केले. ईशा या फोटोत खूप आनंदात दिसत आहे. ईशाने स्काय ब्ल्यू कलर खास साडी नेसलेली दिसते. पण ईशा कुणासोबत सात फेरे घेणार, तिचा होणारा आयुष्याचा साथीदार कोण आहे, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ईशा घराघरात पोहोचली. फोटोमध्ये ईशा डे पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

Esha Dey
YRF announced Alpha Release Date | आलिया भट्ट स्टारर अल्फाची प्रतीक्षा संपली, यशराज फिल्म्सने रिलीज तारीख केली जाहीर

सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करून ईशाला तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Admin

ईशा डे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. तिच्या कॉमेडी टायमिंगमुळे आणि अभिनयामुळे ती प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली.

दरम्यान, ईशा डेच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

ईशा डेने सुरुवातीला नाटक आणि स्टेज परफॉर्मन्समधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मराठी थिएटर, चित्रपट, वेब सीरीज, टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली. Aiyyaa या हिंदीपटात अंजूची भूमिका तर गुलकंद या मराठी चित्रपटात तिने रागिनी मानेची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news