‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक झेप! ‘धुरंधर 2’ला मागे टाकत ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

‘रामायण’ची २ हजार कोटींकडे वाटचाल; ‘दंगल’चा विक्रम मोडणार?
entertainment
‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक झेप! ‘धुरंधर 2’ला मागे टाकत ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपटfile photo
Published on: 
Updated on: 

entertainment ramayana worldwide box office collection ranbir kapoor movie beat ranveer singh dhurandhar

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण : पार्ट 1’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच असून, हा चित्रपट सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला असतानाही कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

entertainment
Online Game : गेमिंगच्या व्यसनाला पत्नी वैतागली; ऑनलाईन गेमर्सनाच दिली पतीला संपवण्याची सुपारी!

आता या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे. यासह जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘रामायण’ने दुसरे स्थान पटकावले आहे.

‘रामायण’ची किती झाली कमाई?

५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ने २४ दिवसांत जगभरात १,८१४ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात आतापर्यंत १,०१५.२० कोटी रुपये नेट, तर १,२१२.५५ कोटी रुपये ग्रॉस कमाई केली आहे.

दुसरीकडे, परदेशात या चित्रपटाने ६०२ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे चित्रपटाचे एकूण जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन १,८१४.५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘पुष्पा 2’ आणि ‘बाहुबली 2’लाही टाकले मागे

या कमाईसह ‘रामायण’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2 : द रूल’ (१,७४२ कोटी रुपये) आणि प्रभासच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ (१,७८८ कोटी रुपये) या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. आता या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’लाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘धुरंधर 2’ने आपल्या संपूर्ण प्रदर्शन काळात १,८१३.३९ कोटी रुपयांची कमाई केली होती.

entertainment
Cyber Crime : फ्री मूव्हीच्या लिंकवर एक क्लिक, मोबाईल झाला हँग; अन् महिलेच्या खात्यातून ९.९७ लाख लंपास!

‘दंगल’चा विक्रम मोडण्यात अपयश

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत आता ‘रामायण’समोर केवळ आमिर खानच्या ‘दंगल’चे आव्हान आहे. ‘दंगल’ने जगभरात २,०७०.३० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे या यादीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी ‘रामायण’ला अद्याप हा आकडा पार करावा लागणार आहे.

सध्या मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा नाही

येत्या काही दिवसांतही ‘रामायण’ला बॉक्स ऑफिसवर आपली कमाई वाढवण्याची संधी आहे. ४ डिसेंबर रोजी सलमान खानचा युद्धपट ‘मातृभूमी’ आणि २४ डिसेंबर रोजी शाहरुख खानचा अ‍ॅक्शन ड्रामा ‘किंग’ प्रदर्शित होईपर्यंत ‘रामायण’समोर कोणत्याही मोठ्या चित्रपटाचे आव्हान नाही.

त्यामुळे आगामी दिवसांत हा चित्रपट किती कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर या चित्रपटाने जगभरात २,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला, तर असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय चित्रपट ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.