

इमरान हाशमीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलला आणि त्याच्या फॅन्समध्ये संमिश्र भावना उमटल्या आहेत. त्याच्या नव्या प्रोफाइल फोटोमध्ये लांब केस जखमांनी भरलेला आणि रक्ताळलेला चेहरा या प्रोफाइलमध्ये दिसतो आहे. इम्रानच्या लूकमुळे त्याच्या चाहत्यांना आवारापनच्या शिवम पंडितची आठवण झाली आहे.
हा प्रोफाइल फोटो अपलोड होताच व्हायरलही झाला. फॅन्सनी लगेच याचा संबंध आगामी आवारापन 2 शी जोडला. यावेळी एक युजर म्हणतो, ‘शिवम पंडित रिटर्न्स'.
इम्रान हाशमीचा आवारापन हा सिनेमा थिएटरवर फ्लॉप ठरला होता. पण टेलिव्हिजनवर रिलीज होताच त्याला चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला.
मोहित सूरीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 2007 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात श्रेया सरन, मृणालिनी शर्मा, अतुल परचुरे आणि आशुतोष राणा हे कलाकार होते. मुकेश भट या सिनेमाचे निर्माते होते. इम्रानच्या चांगल्या सिनेमांपैकी एक मानला जात असूनही प्रेक्षकांनी याला नाकारला आहे.
इम्रानच्या वाढदिवासानिमित्त सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली गेली होती. या सिनेमाच्या टीजरमध्ये मूळ सिनेमाचे काही सीन दाखवले गेले होते. दिग्दर्शक मोहित सूरी सध्या सैयारा सिनेमामध्ये व्यस्त आहेत. यात अहाना पांडे आणि अनीत पड्डा डेब्यू करणार आहेत. हा सिनेमा 18 जुलैला रिलीज होणार आहे.
तर इम्रान आगामी गनमास्टर g9 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून इम्रान आणि हिमेश रेशमिया ही जोडी खूप दिवसांनी एकत्र येत आहे. तर यापूर्वी ग्राउंड झीरो या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.