इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरता; 'या' दिवशी ट्रेलर होणार रिलीज

Ground Zero Movie : चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
Bollywood movie Ground Zero
ग्राउंड जीरो मुव्ही file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक्सेल एंटरटेनमेंट त्यांच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'ग्राउंड झिरो' च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा एक दमदार टीझर प्रदर्शित झाला. या टीझरला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे याची तारीख स्पष्ट केली आहे.

चित्रपटात 'ही' भुमिका साकारतोय इमरान हाश्मी

'ग्राउंड झिरो', या बहुचर्चित चित्रपटात इमरान हाश्मी बीएसएफ कमांडंट नरेंद्र नाथ धर दुबे यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. २७ मार्च रोजी या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले होते. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये इमरान हाश्मी कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा असलेला दिसला. ज्यामध्ये तो हातात बंदूक घेऊन काश्मीरचे दृश्य पाहत होता. काही घरांमधून दाट काळा धूर येत होता, जो स्फोटाचे संकेत देत होता असे हे पोस्टर होते.

'या' दिवशी ट्रेलर होणार रिलीज

'ग्राउंड झिरो' चे नवीन पोस्टर आज ५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज करण्यात आले. ज्यामध्ये इमरान हाश्मी बंदूक धरलेल्या एका शक्तिशाली अवतारात दिसत आहे. पोस्टर रिलीज सोबतच आज चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news