

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड क्वीन कंगना रनौत यांचा चित्रपट 'इमरजन्सी'चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये आणीबाणी लागल्यानंतरची देशातील परिस्थिती दाखवण्यात आलीय.
नव्या वर्षात अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट १७ जानेवारी, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.
चित्रपट इमरजन्सी विषयीचा वाद मिटला असून आता रिलीजसाठी मार्ग मोकळा झाला आहे. निर्मात्यांनी कंगनाच्या या चित्रपटाचा दुसरा लेटेस्ट ट्रेलर आज ६ जानेवारीला रिलीज केला आहे. १ मिनिट ५० सेकंदाचा हा दुसरा ट्रेलर पाहून हे स्पष्ट झाले आहे की, चित्रपटामध्ये आपात्कालीन इनसाईड स्टोरी दाखवण्यात आली आहे.