पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही क्वीन, निर्माती एकता कपूरने सर्वात मोठे हिंट दिला आहे की, क्योंकि सास भी कभी बहु थी २ व्हर्जन येत आहे. या नव्या व्हर्जनचे १५० एपिसोड्स असतील. या शोचा उद्देश जुन्या मालिकेतील एपिसोड्स सोबत मिळून २००० एपिसोड्स पूर्ण करणे असेल. सर्वात औत्सुक्याचे म्हणजे स्मृती ईरानी पुन्हा ‘तुलसी’च्या भूमिकेत दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकता कपूरने हिंट देत म्हटले आहे की, एक राजनेता पुन्हा एंटरटेनमेंटमध्ये परतत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की, स्मृती ईरानी या नव्या मालिकेतून वापसी करू शकतात. आधी त्या अभिनयाचे क्षेत्र सोडून राजकारणात उतरल्या होत्या.
एका इंग्रजी वेबसाईट्सच्या रिपोर्टनुसार, एकता कपूरने एका इव्हेंटमध्ये म्हटलं की, या नव्या मालिकेचे व्हर्जन जवळपास १५० एपिसोड्सचे असेल. यामागे एक खास उद्देश आहे.
सर्वात मोठा प्रश्न हा होता की, स्मृती ईरानी या मालिकेत पुन्हा दिसणार का? त्यांनी याआधी तुलसी ही भूमिका साकारली होती. यावर एकता कपूरने हिंट देत म्हटले की- आम्ही एंटरटेनमेंटमध्ये राजकारण आणत आहोत. एक राजनेता पुन्हा एंटरटेनमेंटमध्ये आणत आहोत.