

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'एक राधा एक मीरा' ७ फेब्रुवारी २०२५ पासून चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. महेश मांजरेकर यांच्या एक राधा एक मीरा चित्रपटाचे निर्माते अविनाश कुमार, प्रभाकर आहले आहेत. चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, मेधा मांजरेकर, संदीप पाठक, आरोह वेलणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट, स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. ‘एक राधा एक मीरा’ एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे. आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. (Ek Raadha Ek Meera Movie) सोनू निगम, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांचे पार्श्वगायन आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे. (Ek Raadha Ek Meera Movie)