

पुढारी ऑनलाईन डेस्क - बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय शो 'ड्यून: प्रोफेसी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. कमी स्क्रीन टाईममध्येदेखील तब्बू दमदार भूमिका साकारताना दिसत आहे. 'ड्यून: प्रोफेसी'च्या प्रीमियर तारीखवरून पडदा हटला आहे. कनिंग हँड, एनाबेलिटा फिल्म्स आणि लेजेंडरी टेलीव्हिजन द्वारा निर्मित या शोमध्ये तब्बूच्या उपस्थितीने भारतीय प्रेक्षकांच्या मध्ये उत्साह निर्माण केला आहे. जारी झालेल्या शोच्या टीजरमध्ये सिस्टर फ्रांसेस्काच्या भूमिकेत तब्बूची एक झलक दिसते. आता ट्रेलरमध्ये तिची भूमिका दमदार दिसते. 'ड्यून : प्रोफेसी'च्या प्रीमियरच्या तारखेवरून पडदा हटवण्यात आला आहे.
'ड्यून : प्रोफेसी' ड्यून सीरीज केविन जे एंडरसन आणि ब्रायन हर्बर्ट द्वारा लिहिण्यात आलेली कादंबरी सिस्टरहुड ऑफ ड्यूनशी प्रेरित आहे. ही एक सायन्स फिक्शन वेब सीरीज आहे. यामध्ये एकूण सहा एपिसोड असतील. सीरीज दोन हरकोनेन बहिणीं (वाल्या आणि तुला)ची आहे. इंटरेस्टींग ट्रेलर सोबत निर्मात्यांनी शोची रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे.
'ड्यून: प्रोफेसी' अमेरिकेत १७ नोव्हेंबरला मॅक्सवर रिलीज होईल. ट्रेलरसोबत जियो सिनेमाने खुलासा केला आहे की, 'ड्यून: प्रोफेसी'चा प्रीमियर भारतात १८ नोव्हेंबरला होईल. सहा-एपिसोडचे हे सीजन १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० ला जियो सिनेमा प्रीमियमवर रिलीज होईल. 'ड्यून: प्रोफेसी' मध्ये एमिली, ओलिविया विलियम्स, ट्रॅविस फिमेल, जोहदी मे, तब्बू, सारा-सोफी बोस्निना, एडवर्ड डेविस, फॉइलेन कनिंघम, मार्क स्ट्रॉन्ग, क्लो ली, जोश हेस्टन, जेड एनोका, शालोम ब्रून-फ्रँकलिन, क्रिस मेसन, एओइफ हिंड्स यांनी अभिनय केला आहे.