

पुढारी ऑनलाईन डेस्क - ग्रॅमी ॲवॉर्ड विजेती दुआ लीपा भारतात आलीय. ती मुंबईत परफॉर्म करेल. पण, त्याआधी तिने बांद्रामध्ये भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड Callum Turner देखील होता. Dua Lipa चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या गाडीतून उतरताना दिसत आहे. पण, तिच्या बॉडीगार्डने पॅपराझींना आधीच सावधानतेचा इशारा दिला की, तिला कोणतीही अडवणूक करू नये. दुआ देखील पॅपराझींना पोज न देता थेट रेस्टॉरेंटच्या आतमध्ये गेली.
दुआ भारतात आल्यानंतर मुंबई विमानतळावरून तिचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यामध्ये पॅपराझी तिच्या नावाने हाक मारत होते. त्यावेळी ती थांबली नाही.
दुआ, एका कॉन्सर्टच्या दुसऱ्या एडिशनसाठी भारतात परफॉर्म करेल. हा कार्यक्रम ३० नोव्हेंबरला आहे.