पुढारी ऑनलाईन डेस्क - 'ड्रामा ज्युनियर्स' हा लहान मुलांचा रिॲलिटी शो प्रेक्षकांची मने जिकंत आहे. छोट्या मुलांचे दमदार अभिनय प्रेक्षकांना चकित करत आहे. या वीकेंडला म्हणजेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'ड्रामा ज्युनियर्स’चा एक विशेष भाग प्रसारित होणार आहे. जिथे हे आपले छोटे स्पर्धक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला प्रसंग सादर करणार आहेत.
तसेच श्री स्वामी समर्थ महाराज याची माहिती सांगणारा प्रसंगही इथे सादर होणार आहे. या निमित्ताने पूजनीय आणि आदरणीय महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग सादर करून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपले 'ड्रामा ज्युनियर्स' करणार आहेत.
या सादरीकरणातून 'ड्रामा ज्युनियर्स' ने परिक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही प्रशंसा मिळवली आहे. लहान मुलांनी केलेल्या या उत्कृष्ट सादरीकरणातून मोठ्यापासून ते लहान प्रेक्षकवर्गकडून अपार प्रेम आणि कौतुक मिळत आहे.
या विशेष भागाद्वारे 'ड्रामा ज्युनियर्स'ने शिक्षणाला मनोरंजनाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. 'ड्रामा ज्युनियर्स' शनिवार-रविवार रात्री ९ वा. झी मराठीवर पाहता येईल.