

दिशा पाटणी आणि मौनी रॉय यांनी गोव्यात धमाल पद्धतीने न्यू इयर सेलिब्रेट केला असून त्यांच्या पार्टी, डान्स आणि मस्तीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघींची केमिस्ट्री आणि एनर्जेटिक मूड चाहत्यांना खूपच भावत आहे.
Disha Patani-Mouni Roy New Year Celebration in goa
नवं वर्ष सुरु होण्यासाठी काही अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी पूर्वसंध्येलाच दिशा पटानी आणि मौनी रॉय नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात पोहोचल्या आहेत.
बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि फिट अभिनेत्री दिशा पटानी आणि लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय यांनी नववर्षाचे स्वागत गोव्यात धमाल पद्धतीने केले. समुद्रकिनारा, म्युझिक, डान्स आणि मस्तीने भरलेले त्यांचे न्यू इयर सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गोव्यामधील एका खासगी पार्टीत दिशा आणि मौनी यांनी मित्रमैत्रिणींसोबत नववर्षाचा जल्लोष केला. दोघीही स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून त्यांच्या एनर्जेटिक मूव्ह्ज आणि चेहऱ्यावरील हास्य-आनंदाने पार्टीचा माहोल अधिकच रंगला
बीचवर या मित्रमंडळींनी क्लिक केलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खुद्द मौनी रॉयने हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत
मौनी रॉय आणि दिशा पटानी दोघी जिवलग मैत्रीणी आहेत. मौनीने डार्क ऑरेंज वनपीस तर दिशाने ऑफ शोल्डर पिंक ड्रेस परिधान केला आहे. दोघी अनेकदा एकत्र व्हेकेशन आणि पार्टी करताना स्पॉट होतात
दिशा पाटनी - मौनी रॉय दोघीही सोशल मीडियावर ॲक्टिव राहतात. फॅशन आणि फिटनेसची क्वीन असलेल्या या अभिनेत्री पार्टी फ्रीक आहेत
दोघीही व्हेकेशनचे अनेक फोटोज शेअर करत असतात. फॅन्सनाही त्यांच्या अप़डेट्सची प्रतीक्षा असते
दिशा पटानी-मौनी रॉय यांचा मित्रांसमवेतच्या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय