Ranveer Singh-R. Madhavan movie Dhurandhar first look revealed
मुंबई - रणवीर सिंहने आपल्या ४० व्या जन्मदिनी धुरंधर चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी केला आहे. हा चित्रपट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवनावर आधारीत असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओमध्ये ॲक्शन आणि रणवीरचा इंटेंस लूक दाखवण्यात आला आहे. चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज केला जाईल.
रणवीरने रविवारी इन्स्टाग्रामवर फर्स्ट लूक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, "एक नरक उठेगा। द अननोन मेन की सच्ची कहानी को उजागर करें." व्हिडिओची सुरुवात रणवीरच्या एका अंधार आणि मंद प्रकाशात रस्त्यावर चालण्याने होते. आणि एक व्हॉईसओव्हर उद्धवस्त करण्याचे वचन देतो.
एक क्लोजअप शॉटमध्ये त्याचा रक्ताने माखलेला चेहरा, लांब केस आणि दाढी या लूक सोबत सिगारेट ओढताना दाखवताना आले आहे. यामध्ये अक्षय खन्ना -संजय दत्त यांच्याही नव्या अवतारातील सादरीकरण आहे. व्हिडिओमध्ये चित्रपटाची रिलीज डेट ५ डिसेंबर रोजी पुष्टी करण्यात आलीय. हा चित्रपट प्रभासच्या द राजासाब सोबत क्लॅश होईल.
जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून चित्रपटाची चर्चा आहे. आता टीजर रिलीज झाल्यानंतर आर माधवनचा लूक अजित डोवाल यांच्याशी मिळताजुळता आहे. माधवन हुबेहुब अजित डोवाल दिसत आहे.