Dhurandhar Box Office Collection - वादळ बनून आला रणवीरचा 'धुरंधर'; पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

Dhurandhar Box Office Collection- धुरंधरने पहिल्या दिवशी २८.६० कोटींची कमाई केली. NBOC मध्ये धमाकेदार गल्ला जमवला
dhurandhar poster
dhurandhar fil opening day collection instagram
Published on
Updated on
Summary

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ पहिल्याच दिवशी तब्बल २८ कोटी नेट कमावत बॉक्स ऑफिसवर वादळ घेऊन आला आहे. हा रणवीरच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला असून पुढील दिवसांतही कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Dhurandhar Box Office Collection opening day

मुंबई - धुरंधर रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान घेऊन आला आहे. रिलीजपूर्वी जी प्रचंड चर्चा होती, तितकीच चर्चा चित्रपट रिलीज झाल्यानंतरही कायम आहे. आता पहिल्याच दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. त्याबद्दल जियो स्टुडिओजने एक्स अकाऊंटवर ट्विट केले आहे.

जियो स्टुडिओज × B62 स्टुडिओजचा हा अ‍ॅक्शन-स्पाय थ्रिलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे कथाकथन, स्केल, उत्कृष्ट कामगिरी, तगडे कलाकार, अ‍ॅक्शन, सुंदर छायांकन आणि उत्तम संगीताचा मेळ यामध्ये आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, पाहूया.

सुरुवातच इतकी दमदार झाली आहे, त्यामुळे या विकेंडचा पुरेपूर फायदा रणवीर सिंह स्टारर धुरंधरला होणार आहे. चित्रपटाने ओपनिंग डेला २८.६० कोटींची कमाई केलीय.चित्रपटाचा ग्रोस कलेक्शन अंदाजे ३२ कोटीपेक्षा जास्त आहे.

dhurandhar poster
Dhurandhar Cast Fee | संजय दत्तपेक्षा ५ पटीने अधिक पैसे घेतले रणवीरने तर अक्षय खन्ना, अर्जुन रामपालला सर्वात कमी मानधन

‘धुरंधर’ने फक्त एकाच दिवशी इतकी कमाई केली की त्याने २०२५ च्या काही मोठ्या चित्रपटांच्या ओपनिंग रेकॉर्ड्स तोडले आहेत. चित्रपटाने ट्रेंडमध्ये येताच, सोशल मीडिया आणि समीक्षकांमध्ये त्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

x account
dhurandhar poster
Dhurandhar Part 2 : राकेश बेदीने दुसऱ्या भागाचा केला खुलासा, धुरंधर २ रिलीज डेटवर शिक्कामोर्तब

सोशल मीडियावर #Dhurandhar हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून दाद दिली आहे. अनेकांनी रणवीरच्या दमदार परफॉर्मन्सचे, तर काहींनी चित्रपटातील भव्य अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे कौतुक केले आहे. समीक्षकांच्या मते, पुढील दोन-तीन दिवसांत चित्रपट ७० कोटींवर सहज पोहोचू शकतो.

रणवीर सिंहचा दमदार कमबॅक

रणवीर सिंहसाठी ‘धुरंधर’ हा कमबॅक मानला जात आहे. चित्रपटातील त्याचा लुक, स्टाईल आणि अ‍ॅक्शन सिक्वेन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता चित्रपटाचे विकेंड आकडे काय येतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news