gayatri bhardwaj
gayatri bhardwaj

Gayatri Bhardwaj : ‘ढिंढोरा’मुळे चर्चेत आलेल्या गायत्रीविषयी माहितीये का?

Published on

पुढारी ऑनलाईन

गायत्री भारद्वाज ढिंढोरा या वेब मुव्हीमुळे चर्चेत आहे. ती एक अभिनेत्री, मॉडल आणि डेंटल डॉक्टर आहे. ती एक राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडूही आहे. विशेष म्हणजे ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. गायत्री भारद्वाज हिने fbb कलर्स फेमिना मिस इंडिया दिल्ली २०१८ चा मुकूट आपल्या नावे केला आहे. ती रिअल लाईफमध्ये खूप बोल्ड आहे. तिचे इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटो पाहायला मिळतात. जाणून घेऊया तिच्य़ाविषयी.

गायत्री मिस इंडिया २०१८ च्या टॉप ५ मध्ये होती. तिने fbb फेमिना मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट्स २०१८ आणि कँपस प्रिंसेस २०१८ च्या फायनालिस्टचा किताब आपल्या नावे केलाय. गायत्री द टाइम्स मोस्ट डिसेबल वुमन (२०१८) देखील आहे.

गायत्री २२ वर्षांची आहे. तिचा जन्म दिल्लीमध्य झाला होता. तिने नवी दिल्लीतील मॉडर्न स्कूल बाराखंभा रोड ेयथून शालेय शिक्षण पूर्ण केले. तर पुणे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजमधून पदवी पूर्ण केलीय.

गायत्रीचा ढिंढोरा वेब मुव्ही चर्चेत

गायत्रीचा ढिंढोरा वेब मुव्ही सध्या चर्चेत आहे. या वेब मुव्हीचे ८ एपिसोड तुम्हाला यू-ट्यूबवर पाहायला मिळतील. ढिंढोरा एपिसोड २ मध्ये ताराची भूमिका गायत्रीने साकारली होती.

तिला डेंटिस्ट व्हायचं होतं. परंतु, पदवीनंतर ती मॉडलिंगकडे वळली. पुढे तिने मॉडलिंग क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

२०१९ मध्ये तिचा एक म्युझिक अल्बम आला. २०२१ मध्ये भुवन बम सोत वेब सीरीज ढिंढोरा मध्ये दिसली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news