.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - कोराताला शिवा दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट 'देवरा पार्ट १' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात आज ५ वाजून ४ मिनिटांनी ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीजसाठी सज्ज आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटाची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. जान्हवी कपूरसह सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआर यांची मुख्य भूमिका आहे. सैफ आणि ज्य. एनटीआर यांच्यात घमासान पाहायला मिळणार आहे.
'देवरा'मध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सोबत पहिल्यांदा जान्हवी कपूर यांची जोडी दिसणार आहे. या चित्रपटात रोमान्ससोबत भरपूर धमाकेदार ॲक्शन देखील पाहायला मिळणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी दोघेही बहुप्रतीक्षित 'देवरा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाचे प्रमोशनदेखील जोरात सुरु आहे.
याआधी देवराचे अनेक पोस्टर आणि रोमँटिक गाणीदेखीस रिलीज करण्यात आले आहेत.