Deepika Padukone : लेकीच्या संगोपनासाठी दीपिका चित्रपटातून घेणार ब्रेक

लेकीच्या संगोपनासाठी दीपिका चित्रपटातून घेणार ब्रेक
Deepika Padukone mother
deepika padukone
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आई होण्याचा आनंद साजरा करत आहे. तिनं ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस कन्येला जन्म दिला. यामुळे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. दीपिकाच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सुमारे ९ दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला आता डिस्वार्ज दिला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास ती आपल्या मुलीसह घराकडे निघाली, दीपिका आणि रणवीर सिंग त्यांच्या मुलीसह गिरगावातील एचएन रिलायन्स रुग्णालयातून बाहेर पडले. यावेळी गुप्तता राखण्यासाठी मोटारीच्या काचा पूर्णपणे काळ्या कपडयानं झाकल्या होत्या. यामुळं दीपिकाची कोणतीही झलक दिसू शकली नाही, दीपिका लेकीच्या पालनपोषणासाठी अभिनयापासून काही काळ दूर राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

दीपिका आपल्या मुलीचं संगोपन करण्यासाठी रणबीर आणि आलियाची पालकत्वाची भूमिका निभावू शकतात. दीपिका तिच्या मुलीच्या संगोपनासाठी ऐश्वर्या राय-बच्चन हिला फॉलो करू शकतेऐश्वर्याने लेक आराध्याला स्वतः वाढवलं आहे आणि नॅनीचा वापर केला नाही. अशा स्थितीत दीपिकाही आपल्या मुलीसाठी नैनी ठेवणार नसून, तिला एकटीनं वाढवणार असल्याचा दावा केला जात आहे.

Deepika Padukone mother
Deepika Padukone : दीपिका पदुकोण मंगळसूत्र न घालताच सिद्धिविनायक मंदिरात, लोक म्‍हणाले...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news