Deepika Padukon: कल्की को मारो गोली! दीपिका पदूकोण करणार या हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स?

सोशल मीडिया पोस्टने तिच्या आगामी हॉलीवुड सिनेमाबाबत अंदाज बांधला जात आहे
Entertainment News
दीपिका पदूकोणPudhari
Published on
Updated on

अलीकडेच कल्की या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने अभिनेत्री दीपिका पदूकोण चांगलीच चर्चेत होती. पण आता एका सोशल मीडिया पोस्टने तिच्या आगामी हॉलीवुड सिनेमाबाबत अंदाज बांधला जात आहे. अर्थात दीपिकाच्या ज्या आगामी हॉलीवूड सिनेमाची चर्चा सुरू आहे तो आहे ट्रिपल एक्स. (Latest Entertainment News)

या सिनेमाच्या सिक्वेलची सध्या चर्चा सुरू आहे. 2017 मध्ये दीपिकाने Triple X : Return Of Xander Cage या सिनेमाटुन्न हॉलिवूड डेब्यू केला आहे. आता या सिनेमाच्या सिक्वेलमध्येही दीपिका दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास हा दीपिकाचा दुसरा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट असणार आहे.

Entertainment News
Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरीने शेयर केली खास न्यूज; ‘ठरलं तर मग मालिकेतून घेतला ब्रेक?

विशेष म्हणजे या सिनेमाचा नायक विन डिझेलने नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे दीपिकाच्या दुसऱ्या हॉलीवूड सिनेमाच्या बातम्यांची चर्चा सुरु झाली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘शेयर करण्यासाठी बरेच काही आहे. जगभरातील प्रेक्षक जो या कलाकाराच्या आयुष्याचा आशीर्वाद आहे.

विशेष म्हणजे या सिनेमाचा नायक विन डिझेलने नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे दीपिकाच्या दुसऱ्या हॉलीवूड सिनेमाच्या बातम्यांची चर्चा सुरु झाली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘शेयर करण्यासाठी बरेच काही आहे. जगभरातील प्रेक्षक जो या कलाकाराच्या आयुष्याचा आशीर्वाद आहे.

आर्बर किंगमध्ये ग्रुटचे परत येणे, कोल्डर्स ओथ नावाचा कुख्यात गुप्तहेर झेंडरचा मुंबईतील थरार, लॉस एंजल्समधील कार रेसर्सचे पुनर्मीलन आणि जाहीर आहे फ्यूरियन.. तुमच्या सगळ्यांचे आभार आहेत. तुम्हाला अभिमान असेल अशी आशा आहे.’

या पोस्टमुळे दीपिका तिच्या पहिल्या भागातील व्यक्तिरेखा सेरेनाच्या रूपात दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Entertainment News
Sushil Kumar Shinde film screening: फिल्म स्क्रीनिंगला नातवाच्या गर्लफ्रेंडसोबत एंट्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ठरले चर्चेचा विषय!

दीपिका कल्कीमधून बाहेर का?

दीपिकाने या सिनेमासाठी 25 कोटी रुपये फी मागितली होती. तसेच दीपिकासोबत येणाऱ्या 25 क्रू मेंबरसाठीदेखील भली मोठी रक्कम आकारली गेली. पहिल्या भागापेक्षा दीपिकाने 25% फी वाढवली. याशिवाय तिचे शूटिंगची वेळ केवळ 7 तासच असावीत अशी मागणीही केली. निर्मात्यांनी तिला त्या बदल्यात आरामदायी व्हॅनिटी वॅन देण्याची घोषणा ही केली. तसेच तिच्या 25 टीममेंबरसाठी चांगल्या हॉटेलची मागणी ही केली गेली. आधीच वाढत्या बजेटने त्रस्त असलेल्या निर्मात्यांनी दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवणे पसंत केले. तर दीपिकाने दुसरीकडे शाहरुखसोबत किंग सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे नुकतेच शेयर केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news