दीपिका पादुकोणने उडवली रणवीर सिंहच्या ड्रेसची खिल्‍ली

ranveer singh and deepika padukone
ranveer singh and deepika padukone
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला '83' हा चित्रपट अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, सध्या या चित्रपटाचे प्रमोशन भारत आणि भारताबाहेरही सुरू आहे. भारताने 1983 मध्ये मिळवलेल्या विश्‍वचषक स्पर्धेच्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. सध्या रणवीर सिंह आणि दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला गेले असून, तिथे झालेल्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमात दीपिकाने चक्‍क रणवीरच्या कपड्यांची खिल्ली उडवली.

सोशल मीडियावर रणवीर-दीपिकाच्या या दुबई प्रमोशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रणवीरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशाच हटके लूकला पसंती दिली होती. यावेळी तो सोनेरी रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट अशा अवतारात दिसला. त्याचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्याची पत्नी दीपिकानेच त्याच्या या 'लूक'ची खिल्ली उडवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news