

पुढारी ऑनलाईन डेस्क - सध्या शाहरुऱख खानच्या किंग या चित्रपटाची चर्चा होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामध्ये सुहाना खान मुख्य भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर आले होते. आता कास्टिंग विषयी नव अपडेट समोर आले आहे. दीपिका पदुकोन सुहानाच्या आईची भूमिका साकारू शकते, असे म्हटले जात आहे.
सुहाना खानच्या आईच्या भूमिकेसाठी दीपिकाला अॅप्रोच करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे रिअल लाईफमध्ये आई झाल्यानंतरही मोठ्या पडद्यावर देखील तिला पहिल्यांदाच सुहानाच्या आईच्या भूमिकेत पाहता येणार आहे.
'किंग' चित्रपट एक थ्रिलर ड्रामा आहे. शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. असे म्हटले जात आहे की, हा सिनेमा बॉबी देओलचा २००० साली रिलीज झालेला चित्रपट 'बिच्छू' शी प्रेरीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पठान, वॉर फेम सिद्धार्थ आनंद करणार आहेत.