पुढारी ऑनलाईन डेस्क - मार्वल स्टुडियोजने 'डेडपूल अँड वूल्वरिन' साठी भरपूर अनुभव देण्यासाठी आणि फॅन्सचा उत्साह वाढवण्यासाठी भुवन बाम आणि फिटनेस आयकॉन विद्युत जामवाल यांना सहभागी करून घेतले आहे. डिज्नी+ हॉटस्टारवर डेडपूल अँड वूल्वरिन स्ट्रीमिंग झाले आहे. विद्युत जामवालला रयान रेनॉल्ड्स आणि ह्यूग जॅकमॅन यांच्याद्वारे स्क्रीनवर दाखवण्यात येईल. विद्युतला जबरदस्त ॲक्शन खूप आवडते. याआधी डिज्नी+ हॉटस्टारवर विद्युतचा चित्रपट क्रॅक रिलीज झाला होता. यावेळी मार्वल स्टुडिओजच्या लेटेस्ट ब्लॉकबस्टरसाठी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि इंग्लिशसहित अनेक भाषांमधील चित्रपटासाठी विद्युत खूप उत्साहित आहे.
विद्युतच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. डिज्नी+ हॉटस्टारच्या सहकार्य निर्मितीने या व्हिडिओमध्ये विद्युत हाय-ऑक्टेन सीक्वेन्स विषयी सांगत आहे. शानदार स्लो-मोशन शॉट्स सोबत डेडपूल ॲण्ड वूल्वरिन प्रेक्षकांनी नक्की पाहायला हवा. मला ॲक्शन चित्रपट खूप आवडतात, असेही विद्युत जामवाल म्हणतो.
विद्युत म्हणाला, डेडपूल ॲण्ड वूल्वरिनमध्ये मला खूप मजा आली. चित्रपटातील ॲक्शन, जबरदस्त स्टंट, शानदार दृश्ये आहेत. मी रयान रेनॉल्ड्स आणि ह्यूग जॅकमॅन यांच्यात ब्रोमान्स पाहायला उत्साहित आहे. मी नेहमीच वूल्वरिनकडे आकर्षित होतो आणि त्याला डेडपूल सोबत पुन्हा ॲक्शनमध्ये पाहून खूप उत्साहित आहे. सर्वात चांगली गोष्ट आहे की, हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये उपलब्ध आहे. हा एक असा चित्रपट आहे, जो तुम्ही मिस करू शकत नाही.